पोलीस चौकीत मार्गदर्शन कार्यक्रम
कामरगाव : येथून जवळच असलेल्या खेर्डा बु. येथे पोलीस चौकी स्थापन करण्यात आली असून, रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर या पोलीस चौकीत २० जानेवारी रोजी धनज बु. पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या सूचनेनुसार मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यात वाहनचालकांना रस्ता सुरक्षेसाठी आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले.
---------------------
रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती
धनज बु.: रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत नागपूर-औरंगाबाद महामार्गावर पोलीस आणि सर्वधर्म आपात्कालीन संस्थेच्या वतीने २१ जानेवारी रोजी चालकांना मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली. यात सर्वधर्म आपात्कालीन संस्था प्रमुख श्याम सवाई, कारंजा शहर पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागाचे अंकुश सोनार, अनिल हटकर, शिवाजी केंद्रे, युसूफ कालीवाले, प्रतीक राऊत यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
----
वढवी येथील एक बाधित
धनज बु.: कारंजा तालुक्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण दरदिवशी आढळून येत आहेत. यात १८ जानेवारी रोजी आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार कारंजा शहरातील दोन व्यक्तींसह ग्रामीण भागातील वढवी येथील एका व्यक्तीला कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाले आहे. त्याच्यावर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार केले जात आहेत.