वाशिम : जऊळका (रेल्वे ) पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी तीन हजाराची लाच स्विकारणाऱ्या निलेश मधुकर मिसाळ (नायक पोलीस शिपाई) याला अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २३ जुन रोजी अटक केली. मालेगाव तालुक्यातील जऊळका (रेल्वे) पोलीस स्टेशन अंतर्गत ‘मिसींगच्या’ प्रकरणात आरोपी न करण्यासाठी नायक पोलीस शिपाई निलेश मिसाळ याने तक्रारदाराला तीन हजाराची लाच मागितली होती. या अनुषंगाने अकोला लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयामध्ये तक्रारदाराने तक्रार अर्ज दिला. अकोला येथील एसीबीच्या पथकाने २३ जुन रोजी जऊळका येथे सापळा रचला असता निलेश मिसाळ याने तक्रारदाराकडून तीन हजार रूपये स्विकारताच मिसाळ याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. मिसाळ याला लाचेच्या रक्कमेसह पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याचेवर कायदेशीर कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
तीन हजाराची लाच स्विकारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 6:40 PM
वाशिम : जऊळका (रेल्वे ) पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी तीन हजाराची लाच स्विकारणाऱ्या निलेश मधुकर मिसाळ (नायक पोलीस शिपाई) याला अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २३ जुन रोजी अटक केली. मालेगाव तालुक्यातील जऊळका (रेल्वे) पोलीस स्टेशन अंतर्गत ‘मिसींगच्या’ प्रकरणात आरोपी न करण्यासाठी नायक पोलीस शिपाई ...
ठळक मुद्दे‘मिसींगच्या’ प्रकरणात आरोपी न करण्यासाठी नायक पोलीस शिपाई निलेश मिसाळ याने तक्रारदाराला तीन हजाराची लाच मागितली होती. या अनुषंगाने अकोला लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयामध्ये तक्रारदाराने तक्रार अर्ज दिला. तक्रारदाराकडून तीन हजार रूपये स्विकारताच मिसाळ याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.