कडा भरण्यासाठी मातीचा वापर !
वाशिम : वाशिम-हिंगोली या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असतानाच या महामार्गाच्या कडा भरण्यासाठी काळ्या मातीचा वापर होत आहे. त्यामुळे पावसाने रस्त्यावर चिखल पसरून वाहने घसरण्याची भीतीही आहे.
दापुरा परिसरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वाशिम : मानोरा तालुक्यातील दापुरासह परिसरात खरीप पिकांवरील कीड नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या अंतर्गत सोमवारपासून कृषी विभागाने विविध ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग राखून सभाचे आयोजन सुरु केले. शेतकऱ्यांना या मार्गदर्शनाचा लाभ हाेत आहे.
पाणंद रस्त्याची दुरवस्था
वाशिम : कामरगाव परिसरातील काही पाणंद रस्त्यांची अवस्था वाईट आहे. त्यात गत आठवड्यात आलेल्या जोरदार पावसामुळे या रस्त्यांवर मोठमोठ्या नाल्या तयार झाल्याने या भागातील शेतकऱ्यांची वहिवाट बंद पडली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला. संबंधितांनी पाणंद रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे.