शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

वाशिम पोलीस देणार युवकांना पोलीस भरती प्रशिक्षण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 3:41 PM

बेरोजगार तरुण, तरुणींसाठी पोलीसदलाच्यावतीने प्रशिक्षणासाठी राबविण्यात येणारा हा पहिलाच उपक्रम आहे.

ठळक मुद्देशारिरीक चाचणीसाठी आवश्यक पात्रता अंगी असावी म्हणून सराव घेण्यात येईल. सर्व जाती-धर्माच्या उमेदवारांसाठी हे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.उमेदवारांनी आपली नावे व मोबाईल कमांक आपल्या हद्दीतील पोलीस ठाण्यात १५ जुलैर्पंत नोंदवावे लागणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना पोलीस भरतीबाबत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात वाशिमपोलिसांच्यावतीने पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरूण, तरूणींना नैपुण्यप्राप्त प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. बेरोजगार तरुण, तरुणींसाठी पोलीसदलाच्यावतीने प्रशिक्षणासाठी राबविण्यात येणारा हा पहिलाच उपक्रम आहे.पोलीस भरतीचा सराव करणाºया तरूण तरूणींसाठी आयोजित प्रशिक्षणात शारिरीक व लेखी परिक्षेत येणाºया विविध विषयांबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. शारिरीक चाचणीसाठी आवश्यक पात्रता अंगी असावी म्हणून सराव घेण्यात येईल. सर्व जाती-धर्माच्या उमेदवारांसाठी हे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी इयत्ता बारावी उतीर्ण व सुदृढ शारिरीक क्षमता असलेल्या व पोलीस भरतीचा सराव करणा-या इच्छूक उमेदवारांनी आपली नावे व मोबाईल कमांक आपल्या हद्दीतील पोलीस ठाण्यात १५ जुलैर्पंत नोंदवावे लागणार आहेत. इच्छुक उमेदवरांकडून नोंदणीची माहिती प्राप्त झाल्यानंतर इच्छुक तरूण, तरुणींना प्रशिक्षणाची तारीख वाशिम पोलीस दलाकडून कळविण्यात येईल. हे प्रशिक्षण उत्साहात पार पाडता यावे आणि त्याचा लाभ आगामी पोलीस भरतीत तरूण, तरूणींना व्हावा म्हणून या प्रशिक्षणासाठी जास्तीतजास्त उमेदवारांनी नोंदणी करून सहभागी व्हावे, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फ पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस