वाशिम : हरविलेल्या मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे संपूर्ण जुलै महिन्यात एक विशेष अभियान ऑपरेशन मुस्कान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हय़ातील हरविलेल्या १६ मुलांचा शोध लागला आहे. हे सर्व मुले आपल्या पाल्यांकडे असल्याने पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या १६ प्रकरणे पोलीस स्टेशनमधील नोंदीमधून कमी झाले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी दिली. राज्यातून मुला-मुलींना पळविण्याच्या प्रकरणांचा आढावा घेतला असता भीक मागण्यासाठी, अन्य राज्यांत विक्री करण्यासाठी, देह विक्रीसाठी वा मोलमजुरीची कामे करून घेण्यासाठी मुलांचे अपहरण केले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण जुलै महिन्यात ह्यऑपरेशन मुस्कानह्ण नावाने एक अभियान पोलीस विभागाच्यावतिने राबविण्यात येत आहे. ह्यऑपरेशन मुस्कानह्ण या अभियानमध्ये हरविलेल्या मुला-मुलींचा अनाथ आश्रम, रेड लाईड एरिया, हॉटेल आदि ठिकाणांवर विशेष पोलीस पथकांच्या नेमणूक करून शोध घेतला जात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनला ह्यऑपरेशन मुस्कानह्ण या मोहिमेसाठी एक पथक तयार करण्यात आले असून त्यांच्याव्दारे शोध मोहिम सुरु आहे. १ जुलैपासून सुरु झालेल्या या ऑपरेशन मुस्कामव्दारे हरविलेल्या १६ मुलांचा शोध लागला असून ते त्यांच्या पालकाकडे सुखरुप आहेत. अनेक पालक आपला मुलगा हरविल्यानंतर तक्रार देता परंतु मिळून आल्यानंतर त्याची माहिती पोलीस विभागाला देत नाही. तर अशा पालकांनी माहिती पुरविण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक साहू यांनी केले आहे.
पोलिसांना लागला हरविलेल्या १६ मुलांचा शोध
By admin | Published: July 10, 2015 1:22 AM