ठळक मुद्दे२०० महिलांच्या स्वाक्ष-यांचे निवेदन ठाणेदारांकडे देण्यात आलेगावात कायमची दारूबंदीची
लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम): दारूबंदीसाठी तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील महिला २९ सप्टेंबर रोजी पोलिस ठाण्यामध्ये धडकल्या. यावेळी २०० महिलांच्या स्वाक्षºयांचे निवेदन ठाणेदारांकडे देण्यात आले. निवेदनात नमूद आहे, की डोंगरकिन्ही येथील महिलांचे संसार उध्वस्त होत आहेत. गावात दारू काढणाºया भटट्या वाढल्या आहेत. काही महिलांचे पती, मुले दारू पिऊन शिवीगाळ आणि मारहाण करतात. एकूणच या सर्व गंभीर बाबी लक्षात घेवून गावात कायमची दारूबंदी करून उध्वस्त होणारे संसार सुरळित होण्यास मदत करावी, अशी गळ महिलांनी ठाणेदारांना घातली.