वाशिम : सर्वत्र पाणी टंचाईन हाहाकार माजविला आहे, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. अशाही परिस्थितीत मानवाप्रमाणेच वृक्षांनाही पाण्याची गरज लक्षात घेता आसेगाव पोलीसांच्यावतिने टँकरव्दारे पाणी आणून वृक्ष वाचविण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे. पाणी टंचाईतही वृक्ष पाण्यामुळे मरू देणार नाही असा संकल्प ठाणेदार विनायक जाधव यांच्यासह पोलीसांनी घेतला आहे. यामुळे सर्व पोलीस स्टेशनचा परिसर उन्हाळयातही हिरवागार दिसून येत आहे.
गतवर्षी जून २०१७ मध्ये लावलेले १५० वृक्ष मागील चार महिन्यापासून टँकरने पाणी आणून भिषण पाणी टंचाईतही हे वृक्ष जगविण्याचे काम आसेगाव पोलिस करीत आहेत. गतवर्षी जून मध्ये आसेगाव पो.स्टे.मघ्ये १५० विविध जातीचे वृक्ष लावण्यात आले, परंतु मागील चार महिन्यापासून आसेगाव येथे पाणी टंचाई असल्याने पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाल्याने हे १५० वृक्ष कसे जगवायचे असा प्रश्न ठाणेदार विनायक जाधव यांना पडला . यावर ही वृक्ष ज्या उत्साहाने व उदेशाने आपण लावलीत त्याच उत्साहाने व उदेशाने जगायला पाहीजे असा संकल्प त्यानंी केला .स्वखर्चाने ५०० रुपये प्रती टँकरने पाणी विकत घेवनू ते स्वत वृक्षाला पाणी देवून वृक्षांचे संवर्धन करतांना दिसून येत आहेत. याकामी त्यांना पोलीस कर्मचाºयांचेही मोलाचे सहकार्य लाभत आहेत्. माह मे आणि जून मध्ये ही झाडे जगली की ही वृक्ष स्वत:च्या भरोषावर जगतात असा ठाणेदार विनायक जाधवचा विश्वास आहे.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या ओवीव्दारे आपण त्यांचे संगोपन करीत आहे. आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही तर अबोल झाडे कसे जगू शकतील. निसर्गाचा समतोल राखावयाचा असेल तर प्रत्येकाने वृक्षसंवर्धन करणे गरजेचे आहे.
- विनायक जाधव, ठाणेदार, आसेगाव