लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ३१ डिसेंबर मावळत्या वर्षाला निरोप व नविन वर्षाच्या स्वागतासाठी तरुणार्इंनी जागोजागी पाटर्यांचे आयोजन केले होते. तसेच विविध हॉटेल्स, बारमध्येही नविन वर्षाच्या स्वागतासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. अपघातांसह अन्य स्वरूपातील अनुचित प्रकार घडू नये, मद्यपान करून वाहने चालविणाºयांवर कारवाई करण्यासाठी कडाक्याच्या थंडीतही शेकोटया पेटवून पोलीसांनी मद्यपीवर ‘वॉच’ ठेवल्याचे दिसून आले. रात्री उशिरापर्यंत पोलीसांचे पेट्रोलिंग वाहन शहरात फिरले असून प्रमुख चौकात पोलीस तैनात करण्यात आले होते. ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून १ जानेवारीच्या पहाटे पाच वाजतापर्यंत हॉटेल, बार, परमिटरूम व इतर आस्थापना सुरू ठेवण्यास शासनाने परवानगी दिली होतीे. यामुळे मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही अपघातांसह अन्य स्वरूपातील अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने ते टाळण्यासाठी मद्यपींवर पोलिसांनी करडी नजर ठेवल्याचे दिसून आले. मद्यपान करून वाहने चालविणाºयांची तपासणी करण्यासाठी प्रमुख चौकांमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरातील सर्वच मुख्य चौकामध्ये पोलीस पथक तैनात करण्यात आले होते. कडाक्याची थंडी असल्याने पोलीस कर्मचाºयांनी शेकोटया तयार केल्या होत्या. तसेच पेट्रोलिंग वाहन सुध्दा सतत शहरात फिरतांना दिसून आले.
कडाक्याच्या थंडीत शेकोटी पेटवून मद्यपींवर पोलीसांचा ‘वॉच’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 2:28 PM