शिखरचंद बागरेचा /वाशिमशहरासह संपूर्ण तालुक्यात सोमवारी जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये पाणी घुसल्याने पोलिसांना कार्यालयीन कामकाज सोडून कार्यालयातून पाणी बाहेर काढण्याचे काम करावे लागले.वाशिम शहरात दुपारी दोन वाजताच्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तीन तास पावसाने शहराला झोडपल्यामुळे शहर जलयमय झाले आणि नाल्यांसह रस्त्यावरून पाणी वाहत होते. सदर जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणच्या मोकळय़ा जागांत तलावसदृष परिस्थिती निर्माण झाली. या पावसामुळे शहराच्या मध्यभागी असलेल्या शहर पोलिस स्टेशनचा परिसर पाण्याने वेढला आणि सतत तीन तास कोसळलेल्या पावसामुळे साचलेले चक्क पोलिस ठाण्याच्या ईमारतीतच घुसले. यामुळे पोलिस ठाण्यालाही तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. ठाण्याच्या ईमारतीत अचानक पाण्याचा लोंढाच आल्याने स्टेशन डायरीच्या कक्षात पाणीचपाणी झाले आणि कर्मचार्यांची एकच तारांबळ उडाली. आता पाण्यात काम कसे करावे किंवा पाणी बाहेर तरी कसे काढावे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला होता
पोलीस ठाण्यात शिरले पावसाचे पाणी !
By admin | Published: July 26, 2016 12:56 AM