मालेगाव : जमिनीच्या मूळ मालकास पेरणी करता येऊ नये, यासाठी स्वत:च्या आईलाच टँक्टरखाली ढकलणाºया इसमावर मालेगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला.तालुक्यातील मुंगळा येथील मुळ शेतमालक महादेव लक्ष्मण राऊत यांनी कैलास दळवी यांना वहितीसाठी जमिन दिली होती, परंतु ती जमिन कैलास दळवी राऊत यांना परत करीत नसल्याने राऊत यांनी सदर प्रकरणी तालुका न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाद मागितली. यामध्ये राऊत यांच्या बाजुने निकाल लागल्याने ते शेतात पेरणी करण्यास गेले असता दळवी आपल्या आईसमक्ष शेतात हजर झालेत. राऊत यांची पेरणी थांबविण्यासाठी स्वत:च्या आईला टॅ्रक्टरखाली ढकलले.
याप्रकरणी सरकारतर्फे पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पिंपळकर यांनी मालेगाव पोलीसांत तक्रार दिली की, मुंगळा येथील महिला पार्वताबाई दळवी हिला तिचा मुलगा कैलास दळवी व नातु अंकुश दळवी यांनी शेतीच्या वादावरुन ट्रॅक्टरखाली टाकले. या फिर्यादीवरुन पोलीसांनी त्या दोघांविरुध्द कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला. यामधील अंकुश दळवी याला पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास मालेगाव पोलीस करीत आहेत.