लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा : कोरोना काळात जिल्ह्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारणीची मागणी शिवसेनेच्यावतिने करण्यात येत आहे. शिवसेनेने याबाबत मागणी केल्याबरोबर यापूर्वीच भाजपाच्यावतिने जिल्ह्यातील वाशिम व कारंजा येथे प्रयोगशाळा उभारणी संदर्भात मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांचेकडे निवेदनाव्दारे मागणी केली असल्याचे भाजयुमो पदाधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविल्याने राजकीय चढाओढ निर्माण झाली आहे. जिल्ह्यात वाशिम येथे कोरोना चाचणी प्रयोगशाळा मंजूर होणार असल्याचे संकेत प्राप्त झाल्याबरोबर यासाठी आपणच प्रयत्न केल्याचे दाखविण्यासाठी भाजपा व शिवसेनेमध्ये चढाओढ दिसून येत आहे.शिवसेनेच्यावतिने प्रयोग शाळा उभारण्याच मागणी केल्याचे पत्रक काढल्यानंतर भाजयुमोच्यावतिने सदर मागणी यापूर्वीच मुख्यमंत्री यांचेकडे केल्याचे पत्रक काढून कोणीही फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न न करण्याचे म्हटले आहे.
कोरोना चाचणी प्रयोगशाळेसाठी राजकीय चढाओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 3:48 PM