वाशिम : जिल्हयातील ७३ ग्रामपंचायतींची निवडणूक ७ आॅक्टोबर रोजी झाल्यानंतर, आता १४ ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी २७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे.
जिल्ह्यात एकूण ४९१ ग्रामपंचायती आहेत. आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असलेल्या एकूण २७३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुक ७ आॅक्टोबर रोजी झाली. तर नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ या कालावधीत मुदत संपणाºया १४ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. त्यानुसार १४ ग्रामपंचायतींसाठी २७ आॅक्टोंबर २०१७ रोजी मतदान होणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व विशेष पथकातील चमू इव्हीएमसह आपापल्या केंद्रांवर रवाना होत आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार २७ आॅक्टोंबर २०१७ रोजी मतदान होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये, शाळा, महाविद्यालये व इतर कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदानाचे एक दिवस अगोदर व मतदानाचा दिवस म्हणजेच २६ आॅक्टोंबर ते २७ आॅक्टोंबर २०१७ या कालावधीत जिल्ह्यातील निवडणूक होत असलेल्या एकूण १४ ग्रामपंचायतींच्या १०० मतदान केंद्रांवर व या केंद्रांच्या १०० मीटर परिसरात तसेच मतमोजणी दिवशी २८ आॅक्टोंबर २०१७ रोजी मतमोजणीच्या ठिकाणांच्या १०० मीटर परिसरात हा प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहे.