शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
2
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
3
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
4
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
5
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
6
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
7
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
8
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
9
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग
10
महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
11
'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका
12
“कुणी मूर्खासारखे काही बोलले तर त्याची नोंद का घ्यायची?”; शरद पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार
13
"ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?
14
राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
15
“महायुतीविरोधात तीव्र संताप, १७५ जागांसह मविआचे सरकार येणार”; नाना पटोलेंचा मोठा दावा
16
"विराटचं काहीतरी बिनसलंय, संघात असूनही तो रोहित अन् गंभीरशी..."; माजी क्रिकेटपटूचा दावा
17
Exclusive: "आम्ही दोघी समोरासमोर उभं राहून...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव
18
परीक्षार्थींच्या आंदोलनासमोर युपीपीएससी नमली; एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा होणार
19
पुन्हा बॅगा तपासल्या! तिसऱ्यांदा तपासणीवर उद्धव ठाकरेंचा रोखठोक प्रश्न; अधिकारी म्हणाले...
20
‘बांगलादेशात ९० टक्के मुस्लिम, सेक्युलर शब्दाची आवश्यकता नाही’, मोहम्मद युनूस सरकार मोठा निर्णय घेणार? 

तलाव, धरणांतील ‘गाळा’ला मिळणार रॉयल्टीतून सूट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 7:23 PM

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, या अभियानांतर्गत धरणांमधील गाळ किंवा माती काढून ती शेतात पसरविण्यासाठी शेतक-यांना आता कोणतीही रॉयल्टी भरावी लागणार नाही, तसेच पाझर तलाव व गाव तलावाच्या पुनरुज्जीवनाकरीता त्याच बुडित क्षेत्रातील काढलेला गाळ किंवा मातीला स्वामीत्व धन, तसेच अर्ज फीमधून वगळण्यात आले आहे.

ठळक मुद्देगाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार अभियान अन्य गौण खनिजांना रॉयल्टी लागू शेतक-यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, या अभियानांतर्गत धरणांमधील गाळ किंवा माती काढून ती शेतात पसरविण्यासाठी शेतक-यांना आता कोणतीही रॉयल्टी भरावी लागणार नाही, तसेच पाझर तलाव व गाव तलावाच्या पुनरुज्जीवनाकरीता त्याच बुडित क्षेत्रातील काढलेला गाळ किंवा मातीला स्वामीत्व धन, तसेच अर्ज फीमधून वगळण्यात आले आहे. दुसरीकडे सवलत धरणांतून किंवा तलावांतून उत्खनन करण्यात येणा-या अन्य गौण खनिजांना रॉयल्टी पूर्वीप्रमाणेच लागू राहणार आहे.धरणांमध्ये साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत घट होत असल्याने सदर गाळ उपसा करुन शेतात गावळ पसरविल्यास धरणांची मुळ साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पादनात वाढ होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. त्या अनुषंगाने धरणांमधील गाळ काढुन तो शेतात पसरविण्यासाठी ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ ही योजना राज्य शासनातर्फे राबविली जात आहे. या योजनेंतर्गत गाळ काढून सदर गाळ शेतात पसरविण्याकरिता स्वामित्वधन (रॉयल्टी) व अर्ज फी मधून सुट देण्याची मागणी विविध स्तरावरून झाली होती तसेच शासनदेखील यासंदर्भात सकारात्मक होते. याप्रमाणेच पाझर तलाव व गाव तलावाची साठवणुक क्षमता वाढविण्याकरिता त्याच्या बुडीत क्षेत्रातील काढलेला गाळ किंवा मातीला स्वामीत्व धन, तसेच अर्ज फी मधून वगळण्याची मागणीही समोर आली होती. त्या अनुषंगाने आता शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या अभियानांतर्गत धरणांमधील काढलेल्या गाळ किंवा मातीला रॉयल्टीतून वगळले आहे. याचा लाभ शेतक-यांना होणार आहे. दुसरीकडे ही सवलत संबंधित धरणातून किंवा तलावातून उत्खनन करण्यात येणाºया  अन्य गौण  खनिजांचा लागू राहणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात वाशिमचे तहसीलदार बलवंत अरखराव यांना विचारले असता, ते म्हणाले की ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ या अभियानांतर्गत वरिष्ठांकडून प्राप्त सुचनेनुसार कार्यवाही केली जाणार आहे.  

टॅग्स :Farmerशेतकरी