छेडछाडच्या घटनांवर नियंत्रणासाठी सरसावली पोलिस यंत्रणा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 15:49 IST
शाळा, महाविद्यालयांना सूचना : अनुचित प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना
छेडछाडच्या घटनांवर नियंत्रणासाठी सरसावली पोलिस यंत्रणा!
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महिला, मुलींच्या छेडखानीच्या घटना घडू नये, त्यावर सदोदित नियंत्रण असावे, यासाठी पोलिस यंत्रणा सरसावली असून शाळा, महाविद्यालय व कोचींग क्लासेसच्या संचालकांना यासंबंधी करावयाच्या उपाययोजनांबाबत निर्भया पथकामार्फत सूचनापत्र पाठविण्यात आले, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी गुरूवार, २७ फेब्रूवारीला दिली.महिला, मुलींवर होणाºया छेडखानीच्या घटनांवर नियंत्रण मिळण्याकरिता शाळा, महाविद्यालयात सीसी कॅमेरे बसविण्यात यावे, महिला व मुलींची तक्रार नोंदवून घेण्यासाठी स्वतंत्र तक्रारपेटी ठेवण्यात यावी,महिला व मुलींच्या संरक्षणासाठी वेळावेळी जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करावे, शाळा-महाविद्यालयात महिला व मुलींची छेडछाड व विनयभंगाची घटना घडल्यास तत्काळ पोलिस स्टेशनला माहिती द्यावी, शाळा-महाविद्यालयात व्हीजीट बुक ठेवण्यात यावे. त्यावर वेळोवेळी दक्षता पथक, निर्भया पथक भेट दिल्याची नोंद करणार आहे, आदी सूचनांचा समावेश असल्याचे पोलिस अधीक्षक परदेशी यांनी सांगितले.