.....................
गाव विकास समितीचे विविध उपक्रम
वाशिम : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या रिसोड येथील लोकसंचालित साधन केंद्राअंतर्गत येणाऱ्या सवड येथे बचतगटातील महिलांकरिता गाव विकास समिती कार्यालय सुरू करण्यात आले. याअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
..................
खरीप हंगामाची शेतमशागत अंतिम टप्प्यात
वाशिम : आगामी खरीप हंगाम अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर शेतमशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. शेतकरी सध्या या कामांमध्ये गुंतले आहेत.
................
राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे
मालेगाव : गत तीन वर्षांपासून मालेगाव-शिरपूर-रिसोड-सेनगाव-हिंगोली या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. जवळपास ५०० कोटी रुपये खर्च करून महामार्गाचे काम आता पूर्णत्वाकडे असल्याचे दिसून येत आहे.
....................
रक्तपेढीत वाढला रक्ताचा साठा
वाशिम : गेल्या काही दिवसांत विशेषत: युवकांनी रक्तदानासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला आहे. यासह काही नेत्यांचे वाढदिवस साजरे झाले. त्यानिमित्तही रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा सध्या वाढला आहे.
.............
गोरगरीब ग्रामीण प्रवाशांची गैरसोय
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून एस.टी.ची प्रवासी वाहतूक बंद आहे. याशिवाय खासगी वाहतुकीवरही निर्बंध लादण्यात आल्याने गोरगरीब ग्रामीण प्रवाशांची गैरसोय होत आहे.
................
ग्रामपंचायतीकडून पाणीटंचाईचे नियोजन
अनसिंग : आगामी काही दिवस गावांत पाणीटंचाई जाणवणार असल्याचे गृहीत धरून स्थानिक ग्रामपंचायतीने पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे सुरू केले आहे. त्या अनुषंगाने पाणीबचतीचे प्रयत्न केले जात आहेत.
.............
रस्ता दुभाजक उभारण्याची मागणी
वाशिम : स्थानिक पाटणी चौक, रिसोड नाका, पाटणी कॉम्प्लेक्सनजीकच्या रस्त्यावर दर्जेदार दुभाजक उभारण्यात यावेत, अशी मागणी सर्वच स्तरांतून जोर धरत आहे.
........................
प्लास्टिकमुळे गुरांचे आरोग्य धोक्यात
वाशिम : प्लास्टिक पिशव्यांच्या विक्री व वापरावर निर्बंध लादण्यात आले आहेत. असे असताना हा नियम पाळला जात नसून, ठिकठिकाणी साचत असलेला प्लास्टिक कचरा सेवनाने मोकाट गुरांचे आरोग्य धोक्यात सापडत आहे.
..................
कोरोना लसीकरण करून घेण्याचे आवाहन
वाशिम : कोरोनाच्या दोन्ही लसी पूर्णत: सुरक्षित असून कोणतीही शंका किंवा भीती न बाळगता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन येथील तहसीलदार विजय साळवे यांनी केले आहे.
...............
गावठाणच्या सीमा निश्चित करा
वाशिम : स्वामित्व योजनेच्या पहिल्या टप्प्यात गावठाणच्या सीमा निश्चित करणे आवश्यक आहे. ही कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांमधून होत आहे.
............
रस्त्याचे काम प्रलंबित; नागरिक त्रस्त
वाशिम : शहरातील परळकर चाैक ते राघोबा मंदिरादरम्यानच्या रस्त्याचे काम प्रलंबित आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून स्थानिक नगर परिषदेने याकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी समाजसेवक संदीप चिखलकर यांनी केली आहे.