------
झोडगा प्रकल्पात २१ टक्के साठा
कारंजा : गेल्या महिनाभरापासून कारंजा तालुक्यात दमदार पाऊस पडत असल्याने बहुतांश प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. तथापि, याच तालुक्यातील झोडगा येथील प्रकल्पात मात्र केवळ २१ टक्के उपयुक्त जलसाठा झाला आहे.
^^^^^^^^^
बेंबळा नदीतून वाळू उपसा
वाशिम : शासनाने नदीपात्रातील वाळू उपशावर बंदी घातली असतानाही धनज बु. येथून जवळच असलेल्या राहाटी, हिंगणवाडी, सिरसोली व आंबोडा या गावांतील बेंबळा नदीपात्रातून भरदिवसा मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. महसूल विभागाचे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
------
आरोग्य केंद्र परिसरात झुडपे
वाशिम : मानोरा तालुक्यातील कुपटा आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या दापुरा आरोग्य उपकेंद्र व अॅलोपॅथी दवाखाना परिसरात मोठ्या प्रमाणात घाण, कचरा पसरला आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भावही वाढल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
----------------
नुकसानाचे अहवाल प्रलंबित
शेलुबाजार : मंगरुळपीर तालुक्यात १० ते १२ जून रोजी आलेल्या पावसामुळे शेलूबाजार परिसरातील शेतात पाणी घुसून जमिनी खरडून गेल्या. या नुकसानाचे अंतिम अहवाल प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांना मदत मिळणार कधी, असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित करीत आहेत.