शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

सीईओंच्या रडारवर आता 'निकृष्ट बांधकाम', जे.ई.ला कारणे दाखवा; ठेकेदाराला दंड!

By संतोष वानखडे | Published: May 16, 2024 7:34 PM

जोगेश्वरी येथील बांधकाम पाडण्याचे निर्देश : धाबे दणाणले

वाशिम : आरोग्य, शिक्षण, पंचायत, पशुसंवर्धन, ग्रामीण पाणीपुरवठा विभागानंतर आता जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या रडारवर जि.प. शाळा, वर्गखोल्यांची निकृष्ट बांधकामे आल्याचे दिसून येते. जोगेश्वरी (ता.रिसोड) येथील भेटीदरम्यान वर्गखोलीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या कारणावरून संबंधित कनिष्ठ अभियंत्यांना (जे.ई.) कारणे दाखवा नोटीस तर कंत्राटदाराला दंड आकारण्याचे निर्देश वाघमारे यांनी दिले.

प्रत्येक विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार व गाईडलाईननुसार कामकाज करावे, गतिमान, लोकाभिमुख व पारदर्शक कामकाजाची कास धरावी यावर जिल्हा परिषद प्रशासनाने भर दिल्याचे दिसून येते. त्याअनुषंगाने बहुतांश अधिकारी, कर्मचाऱ्यांनीदेखील कामकाजात सुधारणा करीत अपेक्षित ‘रिझल्ट’ देण्याला प्राधान्य दिले. सुरूवातीला शिक्षण, महिला व बालकल्याण, पंचायत, आरोग्य, ग्रामीण पाणीपुरवठा, पशुसंवर्धन विभागावर फोकस झाला. आता वर्गखोल्यांची बांधकामे रडारवर आल्याचे बोलले जात आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी जोगेश्वरी येथील जि.प. शाळेला भेट दिली. शाळेच्या परिसरात वर्ग खोलीचे बांधकाम सुरू होते. सदर बांधकामाची पाहणी केली असता ते निकृष्ट दर्जाचे आढळून आले. तिथे उपस्थित इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनीने आपल्या हाताने बांधकामाचा कॉलम अलगद उकरल्याने या कामातील फोलपणा उघडकीस आला. सीईओ वाघमारे यांनी निकृष्ट बांधण्यात आलेले कॉलम पाडून नव्याने बांधकाम करण्याचे निर्देश दिले. निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे संबंधित कनिष्ठ अभियंता (जे.ई.) राम आदमने यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे तसेच संबंधित ठेकेदार नितीन केनवडकर यांना कामाच्या रकमेच्या १० टक्के एवढा दंड आकारण्याचे निर्देश देण्यात आले. या घटनेची गंभीर दखल इतर ठेकेदार व अभियंता  यांनी घ्यावी आणि अंदाजपत्रकानुसार दिलेल्या मानांकनानुसार दर्जेदार काम करावे असे आवाहन सीईओ वाघमारे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिम