शहरं
Join us  
Trending Stories
1
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
4
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
5
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
6
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
7
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
8
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
9
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
10
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
11
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
12
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
13
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
14
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
15
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
16
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
18
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
19
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
20
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ

रेशन दुकानांत ‘पीओएस मशीन’

By admin | Published: March 13, 2017 1:52 AM

वापरण्याचे प्रशिक्षण; सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता.

वाशिम, दि. १२- जिल्ह्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानदारांना बायोमेट्रिक रेशन प्रणालींतर्गत पीओएस मशीनचे वाटप करुन मशीन संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत एकूण ७७४ पीओएस मशिनचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्वच रेशन दुकनदारांना संबंधित तहसील कार्यालयाच्यावतीने पीओएस मशीन वाटप करण्यात आले असून, काही दुकानदारांना या मशिनच्या वापराचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. येत्या आठ दिवसांत जिल्हाभरात ही प्रक्रिया पूर्ण होऊन बायोमेट्रिक रेशन प्रणालीस सुरुवात होणार आहे. या प्रणाली नुसार स्वस्तधान्य कार्डधारकांना आता मशीनमध्ये पीओएस केल्यानंतर धान्याचे वाटप होणार आहे मशीनमध्ये पीओएस केल्यानंतर ज्या कुटूंबातील शिधापत्रीका धारकाचे आधारकार्ड ऑनलाईन नोंदणी असेल तेवढयाच लोकांचे धान्य मिळणार आहे. यासाठी कुटुंबातील सदस्य धान्य घेताना आवश्यक आहे. स्वस्त धान्य विभागातील काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे. प्रत्येक रेशन दुकानदाराला शासन पीओएस मशीन उपलब्ध करून देत आहे. या मशीनला अंगठय़ाचा थम दिल्यानंतरच या कार्डधारकाला धान्य मिळणार आहे. आठवडाभरात बायोमेट्रिक पद्धतीने रेशन वितरणजिल्ह्यातील रेशन दुकानदारांना पीओएस मशिनचे वाटप करण्यात आले. यामध्ये मंगरुळपीर येथील ११८ आणि कारंजा तालुक्यातील १४६ दुकानदारांचा समावेश आहे. या मशिनच्या वापराबाबतचे प्रशिक्षण दुकानदारांना देण्यात येत आहे. यासाठी तहसीलस्तरावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, काही ठिकाणी ही प्रक्रियाही पार पडली आहे. प्रत्यक्षात रिसोड तालुक्यातील सवड आणि रिसोड शहरात दोन महिन्यांपूर्वी या मशिनचा वापर सुरू झाला असून, आठवडाभरात संपूर्ण जिल्ह्यात ही प्रणाली सुरू होण्याची शक्यता आहे.