मालेगाव (जि. वाशिम): नगर पंचायत हद्दीतील जिल्हा परिषद सेस फंड अंतर्गत जि.प. उपकर निधीतील ५ लक्ष रुपयांच्या कामांना नगर पंचायत मालेगावच्या मुख्याधिकारी यांची परवानगी मिळाली नसल्याने ते पैसे परत जाण्याची शक्यता आहे. जि.प. बांधकाम उपविभाग मालेगाव यांच्या २४ जुलै २0१५ च्या पत्रानुसार जि.प. सदस्य चंदु जाधव यांच्या निधीतून ५ लक्ष रुपयांचे विविध कामे मंजुर झाले आहेत. त्यामध्ये मालेगाव येथील वार्ड क्रं. २ मध्ये माळी वेटाळमधील महात्मा फुले पुतळय़ा जवळ पेवर ब्लॉक बसवणे ५0000 रुपये, वार्ड क्रं. १ मध्ये आसरा माता मंदिर ओटा दुरुस्ती करणे ५0000 रुपये वार्ड क्रं. २ मध्ये माळी वेटाळ येथे जय भवानी मंदिरकडे पेवर ब्लॉक बसवणे ५0 हजार ,वार्ड क्रं. ४ मध्ये तेजस्वी महाराज परिसर सुधारणा १ लाख, वार्ड क्रं. १ औदार गरिबान परिसर सुधारणा १ लाख, स्वामी सर्मथ मंदिर पेवर ब्लॉक बसवणे १ लाख यासह विविध कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र काम सुरु करण्यासाठी नगर पंचायत प्रशासनाची मंजुरात अद्याप मिळाली नाही कोणत्याही क्षणी जि.प. सदस्यांचे पद खारीज होवून तो निधी परत जावू शकतो. त्यामुळे या सर्व कामांना त्वरित परवानगी मिळावी, अशी मागणी जि.प. सदस्य चंदु जाधव यांनी केली आहे.
परवानगी अभावी उपकर निधीतील ५ लाख परत जाण्याची शक्यता
By admin | Published: August 13, 2015 1:16 AM