वाशिम : कोरोनातून बरे झाल्यानंतर मोठ्यांसह लहान मुलांदेखील पोस्ट कोविडचा सामना करावा लागत आहे. अंगावर चट्टे, पुरळ, डोळे लाल होणे यासह सिग्निफिकंट हार्ट डिसिजचा धोका असल्याने पालकांनो, पोस्ट कोविडच्या मुलांना जपा असा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी दिला आहे.लहान मुलांची प्रतिकारशक्ती उत्तम असल्याने त्यांना कोरोनापासून किंवा कोरोनामुक्तीनंतरही धोका नाही, असा समज बाळगणे चांगलेच महागात पडू शकते. दुसºया लाटेत जिल्ह्यात १५ वर्षाआतील १७८७ मुलांना कोरोना संसर्ग झाला होता. कोरोनासदृश लक्षणांवर वेळीच उपचार न घेतल्यास कोविडमुक्तीनंतर ‘कावासाकी सिंड्रोम’ हा पोस्ट कोविड आजार होण्याचा धोका असतो. मुंबई, नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी कावासाकीचे रुग्ण आढळले होते. जिल्ह्यातही १० पेक्षा जास्त लहान मुलांमध्ये पोस्ट कोविडचे रुग्ण आढळून आले. यातील बहुतांश मुलांना किरकोळ समस्या उद्भवल्या होत्या. कोरोनापासून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी पालकांनी अधिक सतर्क राहावे, असा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी दिला.
१५ वर्षाखालील १७८७ पॉझिटिव्ह
पहिल्या लाटेत जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. पहिल्या लाटेत १५ वर्षाखालील ६०५ बालकांना कोरोना संसर्ग झाला होता. परंतू, लक्षणे सौम्य असल्याने सर्व बालकांची प्रकृती ठणठणीत होती.दुसºया लाटेत १५ वर्षाखालील १७८७ मुले आढळून आली. यापैकी एका जणाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. उर्वरीत सर्व जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली.