शहरं
Join us  
Trending Stories
1
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
2
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
3
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
4
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
5
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
6
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
7
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
8
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
9
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
10
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
11
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
12
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
13
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
14
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
15
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
16
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
17
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
18
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
19
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
20
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार

डेल्टा प्लस व्हेरिएंटचा संभाव्य धोका; प्रशासन सज्ज  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 12:07 PM

The potential risk of the Delta Plus variant : प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबरोबरच कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : डेल्टा प्लस व्हेरिएंटचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्ह्यात २८ जूनपासून तिसऱ्या स्तरातील निर्बंध लागू होत आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागही सतर्क झाला असून, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबरोबरच कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर राहणार आहे.जिल्ह्यात पहिली लाट ओसरल्यानंतर साधारणत: फेब्रुवारीच्या पंधरवड्यानंतर कोरोनाची दुसरी लाट उद्भवली. मार्च ते मे या तीन महिन्यांत कोरोनामुळे जनजीवन प्रभावित झाले होते. तिसरी लाट ओसरत नाही; तोच आता डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वर्तविला जात आहे. कोरोनाचा डेल्टा प्लस हा व्हेरिएंट झपाट्याने प्रसार करणारा असल्याने दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला मिळालेल्या आहेत. जिल्ह्यात सध्या या व्हेरिएंटचा एकही रुग्ण सापडला नसला तरी खबरदारीच्या उपाययोजना सध्या आरोग्य विभागाकडून केल्या जात आहेत. झपाट्याने प्रसार होणाऱ्या या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रत्येक नागरिकाने घराबाहेर पडल्यावर मास्कचा वापर करणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे तसेच कोरोनासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सर्वच सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून कोव्हॅक्सिन तसेच कोविशिल्ड या दोन्ही लसी उपयुक्त असून जिल्ह्यात सध्या युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबविली जात आहे. नागरिकांनीही कोरोना काळात लसीचे महत्त्व ओळखून नजीकच्या केंद्रावर जाऊन कोविडची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.(प्रतिनिधी)

जिल्ह्यात दररोज दोन हजार चाचणी जिल्ह्यात सध्या नवीन रुग्ण सापडण्याची गती मंदावली आहे. मात्र धोका टळलेला नसल्याने सहाही तालुक्यात अँटिजन व आरटीपीसीआर पद्धतीने कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. प्रत्येक दिवशी किमान दोन हजाराहून अधिक चाचण्या सध्या केल्या जात असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. एप्रिल, मे महिन्यात दैनंदिन ३४०० ते ३८०० दरम्यान चाचण्या केल्या जात होत्या.

एकही कोविड सेंटर बंद नाही

 

  •  कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्ह्यातील एकही कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले नाही.
  •  सरकारी रुग्णालयात बालकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली.
  • आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी खासगी डॉक्टरांची मोट बांधली जात आहे.

अशी घ्यावी खबरदारी

 

  •  परराज्य, परजिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तीला सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसून येताच तातडीने कोरोना चाचणी करावी.
  •  घराबाहेर पडल्यावर मास्कचा वापर करावा, हात सॅनिटाईज करावे.
  •  प्रत्येक पात्र व्यक्तीने कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.
  •  कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तीने कुठलाही घरगुती किंवा अनधिकृत डॉक्टरांकडे उपचार घेऊ नये.
  •  रोगप्रतिकारशक्तीसाठी व्यायाम, सकस आहारावर  भर द्यावा.

जिल्ह्यात सध्या या व्हेरिएंटचा एकही रुग्ण सापडला नसला तरी खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनीदेखील अधिक सतर्क राहून कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, लस घ्यावी.-  डॉ. अविनाश आहेरजिल्हा आरोग्य अधिकारी.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या