शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

‘वॉटर न्यूट्रल’ ठरलेल्या १०० गावात संभाव्य पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 12:12 PM

१०० गावांत संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता कृती आराखड्यातून उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जलयुक्त शिवार अभियानातर्गंत गत चार वर्षात जिल्हयातील जवळपास ६०० गावे वॉटर न्यूट्रल (जलपरिपूर्ण) ठरलेली आहे. यापैकी १०० गावांत संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता कृती आराखड्यातून उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्यात गत चार वर्षात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड झालेल्या गावांत नाला रुंदीकरण, सरळीकरण, खोलीकरण, नाला बांधाचे खोलीकरण, कोल्हापुरी व साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती, पाझर तलाव, लघुसिंचन तलाव दुरुस्ती, नूतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणे, तलावातील माती व नालाबांधातील गाळ काढणे, विहीर, बोअरवेल पुनर्भरण, पिण्याच्या पाण्याचे स्रोत तसेच पाणी वापर संस्थाचे बळकटीकरण आदी कामे पूर्ण केली जातात.सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २०० गावांमध्ये, सन २०१६-१७ मध्ये १४९ आणि सन २०१७-१८ मध्ये १२० आणि सन २०१८-१९ या वर्षात २५२ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. जलसंधारणाची विविध कामे करण्यात आल्याने यामधील ६०० गावांची पाण्याची गरज पूर्ण झाल्याचे दाखवून या गावांचा समावेश ‘वॉटर न्यूट्रल’मध्ये करण्यात आला. पाण्याची गरज भागेपर्यंत कमतरता नाही आणि अतिरिक्त पण नाही, अशा गावांना ‘वॉटर न्यूट्रल’ (जलपरिपूर्ण) म्हटले जाते. वॉटर न्यूट्रल ठरलेल्या १०० गावांत संभाव्य पाणीटंचाई जाणवणार असल्याने तेथे विहिर अधिग्रहण, टँकर, हातपंप आदी उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २०० गावांमध्ये, सन २०१६-१७ मध्ये १४९ आणि सन २०१७-१८ मध्ये १२० आणि सन २०१८-१९ या वर्षात २५२ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. त्या गावाला पाण्याची नेमकी गरज किती आहे, तेथे गरजेऐवढे पाणी उपलब्ध असेल तर त्या गावाचा समावेश वॉटर न्यूट्रलच्या यादीत केला जातो. जिल्ह्यात ६०० च्या जवळपास गावे वॉटर न्यूट्रल आहेत. उन्हाळ्यात जेथे कुठे पाणीटंचाई निर्माण होईल, तेथे उपाययोजना राबविताना ‘वॉटर न्यूट्रल’ यादीची अडचण भासणार नाही. यापुढेही अन्य योजनांमधून जलसंधारणाची कामे होतील. - एस.एम. तोटावरजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीख वाशिम

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई