लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आदर्श आचारसंहितेच्या नियमावलीत नव्याने काही मुद्यांची भर पडून असून, आता उमेदवारी अर्ज सादर करताना तहसील कार्यालयावर शक्ती प्रदर्शन करणे, मिरवणूक नेणे संबंधित उमेदवारांच्या अंगलट येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेवारासोबत दोनपेक्षा अधिक व्यक्ती असल्यास आदर्श आचारसंहितेचा भंग ठरणार आहे.पाच वर्षाचा कार्यकाळ आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१७ मध्ये संपत असल्याने जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने १ सप्टेंबर रोजी घोषित केला आहे. वाशिम तालुक्यातील ५१ ग्रामपंचायती, कारंजा तालुक्यातील ५३, मालेगाव तालुक्यातील ४८, रिसोड तालुक्यातील ४५, मानोरा तालुक्यातील ४१ आणि मंगरूळपीर तालुक्यातील ३५ अशा एकूण २७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. १५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज सादर करण्याला सुरूवात होणार आहे.निवडणुकीसोबतच आदर्श आचारसंहितादेखील लागू करण्यात आली. आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत. आता आदर्श आचारसंहितेच्या नियमावलीत काही मुद्यांची भर पडली आहे. त्यानुसार निवडणुक निर्णय अधिकारी यांचा कार्यालय परिसर प्रामुख्याने तहसिल कार्यालय व त्यांच्या संरक्षक भिंतीपासून १०० मिटरच्या परिसरात निवडणुका जाहीर झाल्यापासून मतमोजणीपर्यंत जमावबंदी लागू करण्यात यावी, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवारासोबत ३ किंवा अधिक व्यक्ती असून नये, उमेदवारासोबत दोनपेक्षा अधिक व्यक्ती असल्यास ही बाब आचारसंहितेचा भंग ठरू शकतो. त्यामुळे संबंधित उमेदवाराविरूद्ध आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल होऊ शकतो, असे प्रशासनाने स्पष्ट केले.आचार संहितेनुसार, ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये प्रत्येक प्रभागासाठी उमेदवाराला एक प्रचार कार्यालय उघडण्याची परवानगी असेल. यासाठी आवश्यक तो विद्युत पुरवठा उपलब्ध करुन देण्याबाबत महावितरणकडून उमेदवाराने रितसर परवानगी प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. निवडणूक काळामध्ये ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असणाºया वाडे, वस्त्या या ठिकाणी मद्य व अन्य पार्ट्या होत असल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने या वाडे, वस्तीवर व रस्त्यावर स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने गस्त घालावी, आदी नव्या मुद्यांची भर टाकण्यात आली आहे. तहसिल क्षेत्रामधील सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणीसाठी तहसिलदार व उपविभागीय अधिकाºयांकडे प्रमुख जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
अर्ज सादर करताना ‘शक्ती प्रदर्शन’ येऊ शकते अंगलट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 7:15 PM
वाशिम : आदर्श आचारसंहितेच्या नियमावलीत नव्याने काही मुद्यांची भर पडून असून, आता उमेदवारी अर्ज सादर करताना तहसील कार्यालयावर शक्ती प्रदर्शन करणे, मिरवणूक नेणे संबंधित उमेदवारांच्या अंगलट येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेवारासोबत दोनपेक्षा अधिक व्यक्ती असल्यास आदर्श आचारसंहितेचा भंग ठरणार आहे.
ठळक मुद्देशक्ती प्रदर्शन करणे, मिरवणूक नेणे संबंधित उमेदवारांच्या येणार अंगलटउमेवारासोबत दोनपेक्षा अधिक व्यक्ती असल्यास आदर्श आचारसंहितेचा भंग ठरणार