नंदकिशोर नारे वाशिम, दि. २२-जिल्हय़ात येत्या २७ नोव्हेंबर रोजी तीन नगर परिषदेची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणीस प्रारंभ केला आहे. काँग्रेस, एमआयएम व सेनेच्यावतीने निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती २१ व २२ ऑक्टोबर रोजी घेण्यात आल्या. यावेळी इच्छुक उमेदवारांनी आपल्याकडे मोठय़ा प्रमाणात जनसमुदाय असल्याचे दाखविण्यासाठी शक्तीप्रदर्शन केले.भाजपाच्यावतीने उमेदवारांना अर्ज देण्यास सुरुवात करण्यात आली असून, अर्ज घेण्यासाठीसुद्धा उमेदवारांसोबत सर्मथक मोठय़ा प्रमाणात दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने २३ ऑक्टोबर रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत. मुलाखतीनंतर नगराध्यक्षपदाचा उमेदवार व महत्त्वाच्या वार्डातील उमेदवाराबाबत पक्षाने चुप्पी साधली आहे. जिल्हय़ातील तीन नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी २४ नोव्हेंबरपासून प्रशासनाकडून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होणार आहे, तत्पूर्वी विविध राजकीय पक्षांच्यावतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी कार्यक्रम नियोजित करण्यात आले आहेत. २१ ऑक्टोबर रोजी वाशिम येथील विठ्ठलवाडीमध्ये काँग्रेसच्या मुलाखती झाल्या. यावेळी नगराध्यक्षासह नगरसेवकाची उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन केले. अनेक उमेदवारांनी तर चक्क जनतेची रॅली काढून विठ्ठलवाडी गाठल्याचे दिसून आले. त्याबरोबरच एमआयएम या पक्षाकडून तीनही नगरपालिकेत निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या, तेथेही उमेदवारांचे शक्तीप्रदर्शन दिसून आले. शिवसेनेच्यावतिने २२ ऑक्टोबर रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जनशिक्षण संस्थान वाशिम येथे घेण्यात आल्या, येथेही मोठय़ा प्रमाणात सर्मथकांसह उमेदवारांची गर्दी होती. भाज पाच्यावतीने २४ ऑक्टोबर तर राष्ट्रवादी २३ ऑक्टोबर रोजी मुलाखती घेणार आहेत. भाजपातर्फे निवडणूक लढवू इच्छिणार्या उमेदवारांसाठी अर्ज वितरण २२ ऑक्टोबरपासून २३ ऑक्टोबरपर्यंंत करण्यात येत आहे. आ. राजेंद्र पाटणी यांच्या कार्यालयात हाऊस फूल गर्दी दिसून येत आहे. सर्वच राजकीय पक्षांचा स्वबळाचा निर्धारस्वबळावर निवडणूक लढविण्याच्या निर्णयामुळे प्रत्येक वार्डात सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार दिसून येणार आहेत. प्रमुख राजकीय पक्ष आपण कोणाशीही युती करणार नसल्याचे म्हणत असल्याने सर्वच पक्षाचे स्वतंत्र उमेदवार निवडणुकीत राहणार आहेत. त्यामुळे पक्षाला निवडणूक लढविताना चांगलीच कसरत करावी लागणार असल्याची राजकीय वतरुळात चर्चा आहे. निवडणूक वातावरण चांगलेच तापले आहे.
इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीत शक्ती प्रदर्शन
By admin | Published: October 23, 2016 1:44 AM