अनसिंग (जि. वाशिम): वीज वाहिणीच्या तारावर आकोडे टाकून चक्क ग्रामपंचायत प्रशासनानेच वीजचोरीचा उद्योग गत महिनाभरापासून चालविला असल्याचे धक्कादायक वास्तव ह्यलोकमतह्णने ८ व ९ ऑगस्ट रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये कैद केले होते. दुसर्या दिवशी यावर अधिकारी यांनी कारवाई केल्याचे अभिप्रेत असतांना मात्र तसे झाले नाही, याचे कारण शोधले असता अधिकारी सुटीवर असल्याचे कारण पुढे आले. वाशिम तालुक्यातील अनसिंग ग्रामपंचायत प्रशासन वीज वितरणच्या स्थानिक अधिकार्यांच्या मेहेरबानीने वीजचोरी कशी करीत आहे, याबाबत सविस्तर वृत्त लोकमतने १0 ऑगस्टच्या अंकात प्रकाशित केले होते. वीज गळती व वीज चोरी थांबविण्यासाठी वीज वितरण कंपनीतर्फे एकीकडे कारवाईची धडक मोहिम राबविली जाते. वीजचोरी पकडण्यासाठी विशेष पथकाचे गठणदेखील केले जाते. मात्र अनसिंगमध्ये सुरु असलेल्या प्रकाराबाबत कोणालाही काही देणे घेणे नसल्याचे दिसून आले. अनसिंग येथील पोलिस स्टेशन, मुस्लीम चौक, प.दी.जैन शाळा, इंदिरा आवास कॉलनी, तलाठी कार्यालयाजवळ असलेल्या खांबावरील पथदिवे आकोड्याद्वारे १0 ऑगस्ट रोजी दिवसरात्र सुरु आढळून आलेत. यासंदर्भात अनसिंग येथील लाईनमन यादवराव खाडे, धोंगडे यांच्याशी संपर्क केला असता साहेब सुटीवर असल्याने आम्ही काहीही करु शकत नाही. असे म्हटल्याने आज दिवसभरही गावात वीजचोरी आढळून आली. तसेच वाशिम येथील वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता गाणार यांच्याशीसंपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.
अधिका-याच्या सुटीअभावी वीजचोरी कायम
By admin | Published: August 11, 2015 12:39 AM