निवेदनात नमूद केले की, ग्राम करडा येथे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार वाढला आहे. या प्रकारामुळे विद्युत उपकरणांवर मोठा परिणाम पडत आहे तसेच उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे वीजपुरवठा आवश्यक ठरत आहे. याबाबत वारंवार विद्युत वितरण कंपनी यांच्याकडे तक्रार दाखल केले. परंतु या बाबीची गंभीरता विद्युत प्रशासनाने घेतली नाही. यामुळे विद्युत ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे. करडा फिडरवर इतर दोन गावांचा अतिरिक्त भार जोडलेला आहे. त्यामुळे या फिडरवर ताण येतो. याबाबत विद्युत कंपनीकडे वारंवार विचारणा केली तरीही ही समस्या सुटली नाही. मागील एक वर्षापासून ही समस्या कायम आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी निवेदनातून सरपंच गंगाबाई देशमुख व प्राध्यापक वसंतराव देशमुख यांनी केली.
करडा येथे विद्युत पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:41 AM