गेल्या कित्येक वर्षांपासून महावितरणकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर ग्राम वडगाव रंगे येथील सिद्धार्थ गोविंदराव तलवारे यांच्या शेतात महिनाभरापूर्वी विद्युत पुरवठ्याचे ९ खांब आणि रोहित्र स्थापित करण्यात आले. मात्र, संबंधित कंत्राटदाराने योग्य पद्धतीने सिमेंट-काँक्रिट करण्याऐवजी खड्डा करून तसेच खांब उभे केले. निकृष्ट दर्जाच्या या कामामुळे ९ जून रोजी झालेल्या यंदाच्या पहिल्या पावसातच रोहित्राला विद्युत जोडणी होण्याआधीच तीन खांब तथा रोहित्र जमीनदोस्त झाले. तथापि, वीज वितरण कंपनीच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने स्थळ पाहणी करून पुन्हा नव्याने विद्युत खांब व रोहित्र उभे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
.....................
कोट :
वडगाव रंगे शिवारात विद्युत खांब व रोहित्र जमीनदोस्त झाल्याबाबतची माहिती मिळाली आहे. स्थळ निरीक्षण करून चौकशी केली जाईल. निकृष्ट काम केल्यामुळे संबंधित ठेकेदारावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच पुन्हा विद्युत खांब व रोहित्र स्थापित केले जाईल.
- विकास सूर्यवंशी
अभियंता, वीज वितरण कंपनी, उंबर्डा बाजार