लोकमत न्यूज नेटवर्कभर जहॉगिर (वाशिम ): रिसोड तालुक्यातील कुऱ्हा येथे परिसरातील गावच्या ग्रामस्थांच्या वीजसमस्या सोडविण्यासाठी वीज उपकेंद्राची उभारणी करण्यात आली, तसेच कार्यालयीन कामकाजासाठी प्रशस्त, अशी इमारतही लाखो रुपये खर्चून उभारण्यात आली. तथापि, लोकार्पण रखडल्यामुळे त्याचा लाभ अद्यापही ग्रामस्थांना झालेला नाही. रिसोड तालुक्यातील अति दुर्गम व दुर्लक्षित भाग असलेल्या कुºहा परिसरातील गावांत राहणाºया ग्रामस्थांना विजेअभावी विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. या भागांत होणारा वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने ग्रामस्थांना अनेक रात्री अंधारात चाचपडत काढाव्या लागल्या. स्थानिक लोकप्रतिनीधींनी या समस्येबाबत वारंवार पाठपुरावा केल्यानंतर या भागातील २० गावांची ही समस्या लक्षात घेऊन शासनाने येथे वीज उपकेंद्राच्या निर्मितीस मंजुरी दिली. त्यानंतर वीज उपकेंद्राचे कामही करण्यात आले आणि या उपकेंद्राचे कामकाज चालविण्यासाठी प्रशस्त अशी इमारतही उभारण्यात आली. या वीज उपकेंद्रामुळे परिसरातील २० गावांत राहणाºया शेकडो कुटुंबाची विजेची समस्या सुटणार आहे. तथापि, या उपकें द्राचे लोकार्पण रखडले आहे. त्यामुळे या वीज उपकें द्राचा लाभ अद्यापही ग्रामस्थांना मिळू शकलेला नाही. महावितरणने याची दखल घ्यावी, अशी मागणी या वीज उपकेंद्रावर वलंबून असलेल्या २० गावांतील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
काही तांत्रिक कामकाजामुळे लोकापर्ण होऊ शकलेले नाही. ही प्र्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच या उपकेंद्राच्या लोकार्पणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.- आर. जे. तायडे कार्यकारी अभियंतामहावितरण, वाशिम