शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पूर्वसूचना न देता तोडला जातोय कृषिपंपांचा वीज पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 11:53 AM

MSEDCL News महावितरणने धडक कारवाईची मोहीम हाती घेत ११ मार्चअखेर १० हजार ४६२ कृषिपंपांचा वीजपुरवठा तोडला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम : वीज तोडणीला देण्यात आलेली स्थगिती सभागृहाच्या परवानगीने उठविण्यात आल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी जाहीर केले. त्यानंतर गुरुवारपासूनच महावितरणने धडक कारवाईची मोहीम हाती घेत ११ मार्चअखेर १० हजार ४६२ कृषिपंपांचा वीजपुरवठा तोडला. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, या धोरणाप्रती शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.विधानसभेत २ मार्च रोजी झालेल्या चर्चेदरम्यान महावितरणच्या थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा तोडण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थगिती दिली होती; मात्र नऊच दिवसांनंतर १० मार्च रोजी अधिवेशनाच्या समारोपीय सत्रात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्थगिती उठवून विद्युत देयक वसुलीचे फर्मान सोडले. यासंबंधीचा आदेश जिल्हास्तरावर धडकला असून, वाशिम मंडळाकडून थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई जोरात सुरू झाली आहे. जिल्ह्यातील वाशिम तालुक्यात १२ हजार १५६, रिसोड तालुक्यातील ११ हजार ५८६, मंगरूळपीर ९ हजार २०६, कारंजा ११ हजार ३७२, मानोरा ७ हजार ३१८ आणि मालेगाव तालुक्यात १० हजार ५८, अशा एकूण ६१ हजार ६९६ कृषिपंपधारक ग्राहकांना ६ हजार ८६१ कृषिपंप रोहित्रांच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येतो. त्यापैकी ११ मार्चअखेर थकबाकीदार असलेल्या १० हजार ४६२ कृषिपंपधारक ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणकडून कापण्यात आला. त्यापैकी ६० ग्राहकांनी चार लाख रुपये रकमेचा भरणा केला असून, उर्वरित ग्राहकांचा विद्युत पुरवठा ठप्प झाला आहे. दरम्यान, काही ठिकाणी महावितरणच्या पथकाने कुठलीही पूर्वसूचना न देता कारवाई केल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत असून, आंदोलनात्मक पवित्रा घेण्याच्या तयारीप्रत शेतकरी पोहोचले आहेत.

महावितरणकडून अचानक सुरू झालेला विद्युतपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईने शेतकरी धास्तावले आहेत. भाजीपाला व फळपिकांचे यामुळे अतोनात नुकसान होणार आहे.  याप्रकरणी आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल.- विष्णूपंत भुतेकर, संस्थापक, भुमिपुत्र शेतकरी संघटना

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण