शिरपूर ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचे पाणीपट्टीचे बिल ग्रामपंचायतकडे थकित झाल्याच्या कारणास्तव लघुसिंचन विभागाने शिरपूर नळ योजनेच्या अडोळ प्रकल्पावरील वीजपुरवठा वीज वितरणला खंडित करावा लावला. शिरपूर ग्रामपंचायतकडे लघू पाटबंधारे विभागाचे पाणीबिलापोटी चार ते पाच लाख रुपये थकीत झाले आहेत. याविषयी ग्रामपंचायतला वारंवार नोटीस व स्मरणपत्र देऊनही पाणीबिल भरण्यास टाळाटाळ करण्यात आले. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून शिरपूर वीज वितरण कार्यालयाला शिरपूर ग्रामपंचायतचा अडोळ प्रकल्पावरील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी नोटीस देण्यात आली. त्यानुसार, वीज वितरण कंपनीने शिरपूर ग्रामपंचायतचा आडोळ प्रकल्पावरील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. परिणामता गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शिरपूर ग्रामपंचायतकडे अगोदरच पाणीपुरवठा योजनेचे वीज वितरणचे बिलापोटी जवळपास ३५ ते ४० लाख रुपये वीजबिल थकीत झाले आहेत. ग्रामपंचायतचेही दोन कोटींहून अधिक रुपये गावातील नागरिकांकडे थकबाकी झाली आहेत. कर वसुलीसाठी ग्रामपंचायत अनुकूल नसल्याने पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की ग्रामपंचायतवर ओढवली आहे. ऑगस्ट महिन्यापासून शिरपूर ग्रामपंचायतचा कारभार प्रशासक व ग्राम विकास अधिकारी यांच्याकडे आहे. १६ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतला नवीन सरपंच लाभणार आहे.
------------------------
लघू पाटबंधारे विभागाच्या वतीने शिरपूर ग्रामपंचायतचे पाणीपुरवठाबाबतचे थकीत बिलामुळे वीजपुरवठा खंडित करण्याचे पत्र प्राप्त झाले. त्यानुसार, वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
- अर्जुन जाधव, कनिष्ठ अभियंता शिरपूर
----------------
शिरपूर ग्रामपंचायतकडे लघुपाटबंधारे विभागाचे पाणी बिल थकीत आहे. वारंवार सूचनापत्र देऊनही पंचायतने पाणीबिल भरले नाही. परिणामत: सदर कारवाई करावी लागली.
प्रशांत बोरसे, लघू पाटबंधारे विभाग वाशिम
लवकरात लवकर कर वसुली करून पाणीबिल भरण्याची तरतूद करू व पाणीपुरवठा सुरळीत करू.
- भागवत भुरकाडे ग्रामविकास अधिकारी, शिरपूर
शिरपूर ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचे पाणीपट्टीचे बिल ग्रामपंचायतकडे थकीत झाल्याच्या कारणास्तव लघुसिंचन विभागाने शिरपूर नळ योजनेच्या अडोळ प्रकल्पावरील वीजपुरवठा वीज वितरणला खंडित करावा लावला. शिरपूर ग्रामपंचायतकडे लघू पाटबंधारे विभागाचे पाणीबिलापोटी चार ते पाच लाख रुपये थकीत झाले आहेत. याविषयी ग्रामपंचायतला वारंवार नोटीस व स्मरणपत्र देऊनही पाणी बिल भरण्यास टाळाटाळ करण्यात आले. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून शिरपूर वीज वितरण कार्यालयाला शिरपूर ग्रामपंचायतचा अडोळ प्रकल्पावरील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी नोटीस देण्यात आली. त्यानुसार, वीज वितरण कंपनीने शिरपूर ग्रामपंचायतीचा आडोळ प्रकल्पावरील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. परिणामत: गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शिरपूर ग्रामपंचायतकडे अगोदरच पाणीपुरवठा योजनेचे वीज वितरणचे बिलापोटी जवळपास ३५ ते ४० लाख रुपये वीजबिल थकीत झाले आहेत. ग्रामपंचायतचेही दोन कोटींहून अधिक रुपयांची गावातील नागरिकांकडे थकबाकी झाली आहेत. कराच्या वसुलीसाठी ग्रामपंचायत अनुकूल नसल्याने, पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की ग्रामपंचायतवर ओढवली आहे. ऑगस्ट महिन्यापासून शिरपूर ग्रामपंचायतचा कारभार प्रशासक व ग्राम विकास अधिकारी यांच्याकडे आहे. १६ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतला नवीन सरपंच लाभणार आहे.
------------------------
लघू पाटबंधारे विभागाच्या वतीने शिरपूर ग्रामपंचायतचे पाणीपुरवठाबाबतचे थकीत बिलामुळे वीजपुरवठा खंडित करण्याचे पत्र प्राप्त झाले. त्यानुसार, वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
- अर्जुन जाधव, कनिष्ठ अभियंता शिरपूर
----------------
शिरपूर ग्रामपंचायतकडे लघू पाटबंधारे विभागाचे पाणीबिल थकीत आहे. वारंवार सूचनापत्र देऊनही पंचायतने पाणीबिल भरले नाही. परिणामत: सदर कारवाई करावी लागली.
- प्रशांत बोरसे, लघू पाटबंधारे विभाग वाशिम
-------------
लवकरात लवकर कराची वसुली करून पाणीबिल भरण्याची तरतूद करू व पाणीपुरवठा सुरळीत करू.
- भागवत भुरकाडे ग्रामविकास अधिकारी, शिरपूर