.................
ग्रामीण रुग्णालयात सुविधांची मागणी
वाशिम : अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना असुविधांना तोंड द्यावे लागत आहे. पिण्याचे पाणी, सुसज्ज शौचालय यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी सागर चव्हाण यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे बुधवारी निवेदनाव्दारे केली.
...................
प्रवासी निवारा उभारण्याची गरज
वाशिम : येथील अकोला नाक्यावर एस.टी.चा थांबा आहे; पण, प्रवासी निवारा नाही. तेथे प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. ही बाब लक्षात घेऊन अकोला नाक्यावर सुसज्ज प्रवासी निवारा उभारण्याची मागणी रवी मोहिते यांनी बुधवारी बांधकाम विभागाकडे केली.
................
दोरी आडवी टाकून वाहतुकीचे नियमन
वाशिम : शहरातील मुख्य चौकामध्ये वाहतूक सिग्नल व्यवस्था अद्याप सुरू झालेली नाही. सकाळच्या सुमारास वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतूक कर्मचाऱ्यांना चक्क दोरी आडवी टाकावी लागत असल्याचे दिसून येत आहे.
.................
चारा पिकांची लागवड नगण्य
वाशिम : दुधाळ जनावरांना वयाच्या २.५ ते ३ टक्के चारा दररोज लागतो. ही गरज भागविण्यासाठी ज्वारी, बाजरी, संकरीत नेपीयन गवत, मका, चवळी, जयवंत, ल्युसर्न आदी प्रकारच्या हिरव्या चारा पिकांची लागवड करणे आवश्यक आहे; मात्र वाशिम तालुक्यात चारा पिकांची लागवड नगण्य स्वरूपात केली जात आहे.
...................
‘भारत नेट’ची कामे खोळंबली
वाशिम : भारत नेट प्रकल्पांतर्गत दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ३४६ ग्रामपंचायतींना हाय स्पीड इंटरनेट सुविधा पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या भौतिक सुविधा बहुतांश ठिकाणी पोहोचल्या आहेत; मात्र काही ठिकाणी वनविभागाकडून परवानगी मिळाली नसल्याने कामे खोळंबली आहेत.