वाशिम : प्रधानमंञी ग्राम सडक योजनेची मूदत ही ३१ मे रोजी संपल्यामुळे या योजनेवर काम करणारे सर्व कर्मचारी घरी बसल्याने राज्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांना खिळ बसणार होती. तसेच राज्य, विभागीय व जिल्हास्तरावर १३८४ पदे ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी ५ जून रोजी रद्द केली होती. परंतु ९ जून रोजी ग्रामविकास विभागाचे उपसचिवांनी ३१ आॅगस्टपर्यंत या योजनेला मुदतवाढ दिली.केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य, विभागीय व जिल्हास्तरावर १३८४ पदे निर्माण करण्यात आली होती. ही सर्व पदे ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी ५ जून रोजी रद्द केली. यामुळे राज्यातील पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कामांना खिळ बसणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. ३१ मे नंतर कोणत्याही पदाचे वेतन काढण्यात येणार नसल्याने कोरोनाच्या पृष्ठभूमिवर पंतप्रधान सडक ग्राम योजनेतर्गंत आलेल्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. विशेषता ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे रखडणार असल्याचे दिसून येत होते. या संदर्भात पंतप्रधान ग्रामसडक योजना कर्मचारी संघटनेही पुढाकार घेवून मुदतवाढीची मागणी केली होती. ग्रामविकास विभागाचे उपसचिवांनी महाराष्टÑ ग्रामीण रस्ते विकास संस्था, कार्यकारी अभियंता यांना पत्र पाठवून कळविले की, वित्त विभागाकडून प्राप्त अभिप्रायानुसार या विभागाील सर्व अस्थायी पदांना १ जून २०२० पासून ३१ आॅगस्ट पर्यंत मुदत वाढ देण्यात आल्याचे कळविले आहे. प्रधानमंञी ग्राम सडक योजनेची मूदत ही ३१ मे रोजी संपल्यामुळे या योजनेवर काम करणारे सर्व कर्मचारी घरी बसले होते, त्यांना कोणत्याच प्रकारचा पगार देण्यात येणार नसल्याचे कळविण्यात आले होते. परंतु नुकतीच या योजनेला ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.- विकास देवकतेमहाराष्टÑ प्रदेश अध्यक्ष, पंतप्रधान ग्रामसडक योजना कर्मचारी सघटना
प्रधानमंञी ग्राम सडक योजनेला मूदतवाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 4:20 PM