शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

जानेवारीत धडकणार ‘पीआरसी’ पथक; वाशिम प्रशासनाची धावपळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 2:19 AM

वाशिम : येत्या १७ ते १९ जानेवारी दरम्यान वाशिम जिल्ह्यात धडकणार्‍या विधिमंडळाच्या पंचायत राज समितीच्या (पीआरसी) दौर्‍याची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (ग्रामीण) प्रशासनाने चांगलीच धास्ती घेतली असून, संभाव्य कारवाई टाळण्यासाठी दस्तावेज व कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात अख्खी यंत्रणा कामाला लागल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देकारवाई टाळण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव जिल्हा परिषद यंत्रणा लागली कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येत्या १७ ते १९ जानेवारी दरम्यान वाशिम जिल्ह्यात धडकणार्‍या विधिमंडळाच्या पंचायत राज समितीच्या (पीआरसी) दौर्‍याची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (ग्रामीण) प्रशासनाने चांगलीच धास्ती घेतली असून, संभाव्य कारवाई टाळण्यासाठी दस्तावेज व कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात अख्खी यंत्रणा कामाला लागल्याचे दिसून येते.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (ग्रामीण) कामकाजात पारदर्शकता राहावी, शासकीय निधीचा विनियोग योग्य पद्धतीने प्रस्तावित कामांवरच व्हावा, शासकीय नियमात हेराफेरी करणार्‍यांवर वचक निर्माण व्हावा, गैरप्रकार करणार्‍यांविरूद्ध कठोर कारवाई व्हावी आदी उद्देश डोळ्यासमोर ठेवून विधिमंडळाच्या पंचायत राज समितीतर्फे स्थानिक स्वराज्य संस्थेला (ग्रामीण) भेट देऊन  पाहणी केली जाते. या दौर्‍यादरम्यान जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतसह जिल्हा परिषद अंतर्गत येणार्‍या सर्वच विभागाची पोलखोल करण्याचे काम पंचायत राज समितीतर्फे केले जाते. पंचायत राज समितीचा दौरा हा वाशिम जिल्ह्यात यापूर्वी ऑगस्ट-सप्टेंबर २0१७ मध्ये येण्याची दाट शक्यता वर्तविली जात होती; मात्र त्या दरम्यानच पूर्वीची पंचायत राज समिती बरखास्त झाली. त्यामुळे हा दौरा लांबणीवर पडला होता. मध्यंतरी नवीन समिती गठीत झाली. या समितीचे अध्यक्ष म्हणून आमदार सुधीर पारवे असून, अन्य २७ आमदार सदस्य म्हणून विराजमान आहेत. उपसचिव दर्जाचे चार अधिकारी व पाच कर्मचारीदेखील या समितीच्या दिमतीला आहेत. वाशिम जिल्ह्यात १७ ते १९ जानेवारी या तीन दिवसात या समितीतील चमूद्वारे जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्राम पंचायतशी संबंधित सर्व कामकाजाची पाहणी व चौकशी केली जाणार आहे. या पाहणीदरम्यान पितळ उघडे पडू नये, याची दक्षता म्हणून अधिकारी-कर्मचारी कर्तव्यात अधिकच व्यस्त झाल्याचे सध्यस्थितीत दिसून येत आहे. स्थानिक निधी लेखा परीक्षण विभागाच्या पथकाने लेखा परीक्षणादरम्यान नोंदविलेल्या काही आक्षेपानुसार समाजकल्याण, महिला व बालकल्याण, बांधकाम, लघु सिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा, पंचायत आदी विभाग पंचायत राज समितीच्या रडारवर येण्याची शक्यता विश्‍वसनीय सूत्रांनी वर्तविली.

आक्षेपांचे निराकरण करण्याची कसरत.स्थानिक निधी लेखा परीक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या विभागांचे लेखा परीक्षण करताना काही आक्षेप नोंदविले आहेत. या आक्षेपाच्या दृष्टिने यापूर्वीच सारवासारव करण्यात आली. आता परत एकदा या सारवासारववर शेवटचा हात फिरविला जात असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या जमा-खर्चाचा हिशेब व्यवस्थित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सध्या प्रशासनाची चांगलीच धावपळ सुरू असल्याचे दिसून येते. कागदोपत्री परिपूर्ण राहण्याच्या सूचना असल्याने आर्थिक हिशेब जुळविण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात अख्खी यंत्रणा गुंतली असल्याचे दिसून येते.विविध योजनांतर्गतच्या साहित्याचे वाटप, लाभार्थी यादी आदींची माहिती अद्ययावत केली जात आहे. योजनेचे साहित्य, लाभार्थी यादी व प्रत्यक्षातील स्थिती याची पडताळणी होणार असल्याच्या चर्चेने सर्व ‘रेकॉर्ड’ अद्ययावत ठेवण्यासाठी प्रशासनाची कसरत सुरू असल्याचे विश्‍वसनीय सूत्र आहे.गत काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण व स्थायी समितीच्या सभेत शाळा, अंगणवाडीतील पोषण आहार वाटपाचा मुद्दा गाजत आहे. त्या अनुषंगाने पंचायत राज समितीच्या दौर्‍यात पोषण आहार वाटप रडारवर राहण्याची दाट शक्यता आहे.