शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

जानेवारीत ‘पीआरसी’चा वाशिम दौरा; जिल्हा परिषद प्रशासन लागले कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 4:18 PM

वाशिम : येत्या १७ ते १९ जानेवारी दरम्यान वाशिम जिल्ह्यात धडकणाऱ्या  विधिमंडळाच्या पंचायत राज समितीच्या (पीआरसी) दौऱ्या पूर्वी प्रशासनातर्फे बैठकांवर बैठका घेतल्या जात असून, रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्दे पंचायत राज समितीच्या आगामी दौऱ्याच्या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनातर्फे विभागनिहाय सभा, बैठका घेऊन संपूर्ण रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. सध्या जिल्हा परिषद, पंचायत समितीस्तरावर केवळ ‘पीआरसी’च्या आगामी दौऱ्याचीच चर्चा ऐकायला मिळत आहे.

वाशिम : येत्या १७ ते १९ जानेवारी दरम्यान वाशिम जिल्ह्यात धडकणाऱ्या  विधिमंडळाच्या पंचायत राज समितीच्या (पीआरसी) दौऱ्या पूर्वी प्रशासनातर्फे बैठकांवर बैठका घेतल्या जात असून, रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे दिसून येते.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (ग्रामीण) कामकाजात पारदर्शकता राहावी, शासकीय निधीचा विनियोग योग्य पद्धतीने प्रस्तावित कामांवरच व्हावा, शासकीय नियमात हेराफेरी करणाºयांवर वचक निर्माण व्हावा, गैरप्रकार करणाºयांविरूद्ध कठोर कारवाई व्हावी आदी उद्देश डोळ्यासमोर ठेवून विधिमंडळाच्या पंचायत राज समितीतर्फे स्थानिक स्वराज्य संस्थेला (ग्रामीण) भेट देऊन  पाहणी केली जाते. या दौºयादरम्यान जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतसह जिल्हा परिषद अंतर्गत येणाºया सर्वच विभागाची पोलखोल करण्याचे काम पंचायत राज समितीतर्फे केले जाते. पंचायत राज समितीच्या आगामी दौऱ्याच्या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनातर्फे विभागनिहाय सभा, बैठका घेऊन संपूर्ण रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. शासकीय योजनेंतर्गतचा मंजूर निधी, झालेला खर्च आणि प्रत्यक्षातील काम तसेच अन्य दंड, वसूली असल्यास चालानच्या पावती व अन्य प्रशासकीय सोपस्कार परिपूर्ण ठेवण्याच्या दृष्टिने बैठका घेतल्या जात असल्याचे दिसून येते. सध्या जिल्हा परिषद, पंचायत समितीस्तरावर केवळ ‘पीआरसी’च्या आगामी दौºयाचीच चर्चा ऐकायला मिळत आहे. प्रत्येक विभागात अधिकारी व कर्मचारी हे संपूर्ण रेकॉर्ड अद्ययावत करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येते. जमा-खर्चाचा ताळमेळ बसविण्यात काही विभागांची चांगलीच दमछाक होत असल्याची चर्चा आहे. स्थानिक निधी लेखा परीक्षक विभागाने नोंदविलेल्या आक्षेपांचे निराकरण, दंड वसूलीसंदर्भातील चालान या दृष्टिकोनातून अधिकारी-कर्मचारी रेकॉर्ड अद्ययावत ठेवत असल्याचे दिसून येते. 

टॅग्स :washimवाशिम