लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे व प्रसंग मागासवर्गीय समाजकल्याण संस्था, जयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील १२ वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांकडून १३ फेबुवारीपर्यंत मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत अनु. जातीतील उमेदवारांना बँक, रेल्वे, एल. आय. सी. इत्यादी लिपिकवर्गीय पदांसाठी चार महिन्याचे निःशुल्क स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण दिले जाते. हा उपक्रम गेल्या १० वर्षांपासून सुरु असून, पूर्णपणे मोफत असलेल्या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी १२ वी उत्तीर्ण असलेल्या विध्यार्थांकडून १३ फेब्रुवारी २०१९ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. या प्रशिक्षणासाठी १७ फेबुवारी २०१९ रोजी चाळणी परीक्षा होणार असून उत्तीर्ण उमेदवारांपैकी ३० टक्के महिला ३ टक्के दिव्यांग व उर्वरित सर्वसाधारण ६७ टक्के अशी आरक्षणनिहाय ५०-५० विद्यार्थ्यांच्या तुकडी मध्ये एकूण १०० विद्यार्थ्यांची चार महिन्यासाठी नि:शुल्क प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे. गुणानुक्रमे निवड झालेल्या उमेदवारांना ८० टक्के हजेरी असल्यास ३ हजार रुपये प्रतिमहिना विद्यावेतन आणि ३ हजार रुपये किमतीचा पुस्तकांचा संच व इतर वाचन साहित्य मोफत दिल्या जाणार आहे. इयत्ता १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले.
मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण; १३ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 2:43 PM