मालेगांव शहराच्या काही भागांत मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरुवात झाली असून, नेहमीप्रमाणे शहरच्या काही भागांत अजूनही नालेसफाईला सुरुवात झाली नाही. शहराच्या शिक्षक काॅलनीच्या भागात थातुरमातुर नाली काढल्या जातात, हा प्रकार गेल्या ३ वर्षांपासून हाेत आहे. काही बांधकामामुळे नालीतील घाण आणि पाणी जायला जागा नसल्याने ते पाणी तेथे साचते, म्हणून त्या भागात रोगराई पसरत आहे. शहरात इतर भागात नालेसफाईचे काम सुरू आहे. मात्र, नवीन वस्त्या, तसेच शिक्षक काॅलनीमधून अजूनही नालेसफाई केली गेली नाही. ती नालेसफाई करून पाण्याचा कायम बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
‘शहरात मान्सूनपूर्व नालेसफाई सुरू केली असून, सर्व भागात टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे.
.... सतीश शेवदा, अभियंता मालेगांव नगरपंचायत
.................