----------------
स्वच्छतेबाबत मार्गदर्शन
वाशिम: कारंजा तालुक्यातील कामरगाव रस्त्यावर कचरा टाकण्यात येत असल्याने गावात घाण वाढत आहे. या पृष्ठभूमीवर सरपंचांच्या मार्गदर्शनात ग्रामसचिवांनी सभा घेऊन स्वच्छता राखण्याबाबत मार्गदर्शन केले.
^^^^^
फवारणीबाबत मार्गदर्शन
वाशिम : पिकांवरील कीड नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी करताना घेण्याच्या काळजीबाबत कृषी विभागाकडून १७ जुलै रोजी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम घेतला.
-----------
फळपिकांवर विविध किडीचा प्रादुर्भाव
वाशिम: सद्य:स्थितीत काही ठिकाणी फळपिकांंवर विविध किडींचा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांनी काळजी घेऊन पिकांची स्थिती गंभीर असल्यास कृषी विभागाचा सल्ला घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकाऱ्यांनी गुरुवारी केले.
--------------
ग्रामस्थांना मार्गदर्शन
वाशिम: तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वतीने कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर शुक्रवारी गर्भवती व स्तनदा माता व ग्रामस्थांना फिजिकल डिस्टन्सिंगने आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले.
------------------
युरियाच्या वापराबाबत मार्गदर्शन
वाशिम: पावसामुळे खरीप पिके चांगली बहरत आहेत. शेतकरी या पिकांना अकारण युरियाची मात्रा देत आहेत. प्रामुख्याने सोयाबीन पिकाला युरियाची दुसरी मात्रा देणे अयोग्य असल्याने युरियाच्या वापराबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
------------
मजुरांच्या कामाची देयके प्रलंबित
वाशिम: सन २०१९ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत शेकडो कामगारांना अद्याप मोबदला मिळाला नाही. शेतकऱ्यांना कुशल कामाची देयके ही अद्याप मिळालेली नाहीत. याची दखल घेण्याची मागणी होत आहे.
----------