वाशिम: ग्राहकाचे हित जोपासण्यास राज्य शासनाचे प्रथम प्राधान्य असून त्यादृष्टीने जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून ग्राहकांच्या समस्या तातडीने निकाली काढण्याचा प्रयत्न होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेला सेवा हमी कायदा ग्राहकांच्या हिताचा असून यामुळे विविध शासकीय सेवा वेळेत मिळणे शक्य झाल्याचे मत राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष (मंत्रीस्तरीय) अरुण देशपांडे यांनी व्यक्त केले.स्थानिक जिजाऊ सांस्कृतिक सभागृहात ३१ डिसेंबरला पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, ग्राहक हित जोपासण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. ग्राहकांशी संबंधित शासकीय विभागांचे प्रमुख व ग्राहकांचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक प्रत्येक महिन्याला होते. त्यात ग्राहकांच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. जिल्हास्तरावरील या महत्त्वाच्या बैठकीला सर्व संबंधित विभागांच्या सक्षम अधिकार्यांनी उपस्थित राहणे आवश्यक असून तशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी तातडीने निकाली निघण्यास मदत होईल. राज्य शासनाने ग्राहक धोरण निश्चित करण्याचे ठरविले असून असे धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असणार, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेस जिल्हा पुरवठा अधिकारी खंडागळे उपस्थित होते. 'ऑनलाइन शॉपिंग'बाबत लवकरच ठोस धोरणसध्या ह्यऑनलाइन शॉपिंगह्णचे प्रमाण वाढत आहे. या माध्यमातून फसवणूक झाल्यास अथवा या सेवेबद्दल कुणाकडे दाद मागायची, याविषयी ग्राहक संभ्रमात असतात. अनेक वेळा ह्यऑनलाइन शॉपिंगह्णची सुविधा पुरविणार्या कंपन्या आपली जबाबदारी झटकतात. त्यामुळे ह्यऑनलाइन शॉपिंगह्ण करणार्या ग्राहकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या माध्यमातून ग्राहक संरक्षण कायद्यात बदल करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही देशपांडे यांनी सांगितले.
ग्राहक हित जोपासण्यास प्राधान्य!
By admin | Published: January 01, 2017 1:15 AM