शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘प्रीमियम’ ७00 रुपये; नुकसाभरपाई २00 रुपये

By admin | Published: July 18, 2016 2:46 AM

वाशिम जिल्ह्यातील प्रकार; पीक विमा योजनेअंतर्गत शेतक-यांचे हात रिकामेच.

वाशिम/रिसोड: पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षी खरीप हंगामात विमा उतरविलेल्या वाशिम जिल्हय़ातील काही शेतकर्‍यांना 'प्रीमियम'एवढी रक्कमही मिळत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. रिसोड तालुक्यातील वाकद मंडळांतर्गत ५00 ते ७00 रुपयांदरम्यान प्रीमियम भरणार्‍या अनेक शेतकर्‍यांना पिकांच्या नुकसानापोटी २00 ते २५0 रुपये मिळत आहेत.गतवर्षी (२0१५) जिल्ह्यातील ३ लाख १ हजार ४८३ शेतकर्‍यांनी २ लाख ११ हजार ९३0 हेक्टर क्षेत्रासाठी ३९२ कोटी ५१ लाख रुपयांचा पीक विमा उतरविला होता. या विम्यासाठी २0 कोटी ३१ लाख रुपयांची रक्कम विमा हप्ता म्हणून भरण्यात आली होती.खरीप हंगामात पावसाच्या हुलकावणीमुळे पिके करपलीत. शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले; मात्र गतवर्षीच्या नुकसान भरपाईपोटी शेतकर्‍यांना अत्यल्प नुकसानभरपाई मिळत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. रिसोड तालुक्यातील वाकद मंडळातील काहींनी हेक्टरी ७00 ते १000 रुपये प्रीमियमचा भरणा केला असला तरी शेतकर्‍यांना हेक्टरी २00 ते २५0 रुपये नुकसानभरपाई मिळत आहे. याबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वाकद शाखेचे व्यवस्थापक के.जी. देशमुख यांना विचारणा केली असता, शेतकर्‍यांना हेक्टरी २00 ते २५0 रुपये विमा मंजूर झाल्याने शेतकर्‍यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. नुकसानभरपाईची रक्कम एवढी कमी का, याबाबत संबंधित विमा कंपनीकडे चौकशी करणार असल्याचे देशमुख यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.मालेगाव तालुक्यातही काही शेतकर्‍यांना अत्यल्प नुकसानभरपाई मिळत आहे. बोर्डी येथील तुळशीराम रामकिसन चव्हाण या शेतकर्‍याने गतवर्षी खरीप हंगामात ५९९ रुपये प्रीमियमचा भरणा केला. आता या शेतकर्‍याला नुकसानभरपाई म्हणून ३८३ रुपये मिळाले आहेत. विमा कंपनीकडून होणार्‍या या क्रूर थट्टेचा निषेध म्हणून चव्हाण यांनी ३८३ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांमार्फत संबंधित विमा कंपनीकडे पाठविला आहे.