मंगरुळपीर (जि. वाशिम): महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील मजुरांना काम मिळून त्यांचे जिवनमान उंचवावे याकरीता या योजनेअंतर्गत सन २0१६-१७ च्या कामाचे नियोजन व २0१६-१७ चे लेबर बजेट तयार करण्याबाबत वाशिम जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्यांनी पंचायत समित्यांना पत्र दिले आहे. १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत वार्षिक आराखडा ंमजुर करुन घेवून तो कार्यक्रम अधिकार्यांना सादर करण्याचेही सुचित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या परिपत्रकात मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या असून याकरीता क्षेत्रीय नियोजन अधिकारी हे पंचायत समितीचे तांत्रिक अधिकारी असून त्यांचेवर ८ ते १0 ग्राम पंचायतीचे गट तयार करुन नरेगाच्या कामाचे नियोजन करण्याची व ग्रामसभेस लेबर बजेट सादर करण्याची जबाबदारी असून ज्या ठिकाणी अद्याप नियोजन अधिकार्यांची नियुक्ती केली नाही तेथे संबंधित गटविकास अधिकार्यांनी नियुक्तीची कार्यवाही त्वरित पूर्ण करावी, असे या पत्रात नमुद आहे. केंद्र शासनाने दि. ८.७.२0१५ च्या पत्रानुसार मजुरांचे जिवनमान उंचावल्याचे ध्येय हा केंद्रबिंदू समजून आयपीपीई २ हा कार्यक्रम राष्ट्रीय ग्रामीण जिवन उन्नती अभियान यांच्याशी अभिसरणामार्फत राबविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम नरेगा व जिवन उन्नती अभियान यांच्या यंत्रणेमार्फत एकत्रितपणे करण्यात येणार असून स्वयंसेवी संस्था व यंत्रणा यांचे सहकार्याने करायचा आहे. या योजनेसाठी अनिवार्य समाविष्ट करावयाची कुटुंबे, सर्व बिगर जमीनधारक शेतमजुर कुटुंबे, अनुसूचित जाती जमाती कुटुंबे या प्रवर्गातील लोकांची कामांची मागणी त्यांचेशी प्रत्यक्ष भेटून गोळा करायची असून गरीब कुटुंबाचे जिवनमान उंचावण्याच्या कामांना प्राधान्य देण्याचे परिपत्रकात नमुद आहे. २१ ऑगस्टला राज्यस्तरावरील प्रशिक्षण, ३१ ऑगस्टला प्रशिक्षणार्थीची निवड, १५ सप्टेंबरला तालुकास्तरावरील गटाकरीता प्रशिक्षण, १६ सप्टेंबर आयपीपीई २ कार्यक्रम सुरु करणे तर ३0 नोव्हेंबरला संपन्न करणे, १५ डिसेंबरला ग्रामसभेचे आयोजन व कामांना मंजुरी तर ३१ डिसेंबर २0१५ ला डाटा एन्ट्री व लेबर बजेट तयार करणे असा कार्यक्रमाचा तपशिल तसेच कालावधी पत्रात नमुद करण्यात आला आहे.
रोहयोअंतर्गत मजुर आराखडा तयार करा
By admin | Published: August 13, 2015 1:14 AM