लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील भेटीदरम्यान राज्यातील ‘डिजिटल शाळा व लोकसहभाग’ या विषयावर ५ ऑक्टोबरला मुंबई येथे सादरीकरण होणार आहे. सादरीकरणासाठी राज्यातील १३ जणांची चमू तयार केली असून, यामध्ये पश्चिम वर्हाडातून वाशिम येथील देवीदास महाले या एकमेव शिक्षकाची वर्णी लागली आहे. गत दोन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व गावकर्यांच्या लोकवर्गणीतून ‘डिजिटल शाळा’ हा उपक्रम साकारण्यात येत आहे. ‘डिजिटल शाळे’च्या माध्यमातून अध्ययन, अध्यापन, व्यवस्थापन व समन्वय यातून मुलांच्या शिक्षणाला गती देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला. ‘डिजिटल शाळे’ची मुले संगणक हाताळणी करण्याबरोबरच हव्या त्या संकेतस्थळाला भेट देण्याचा अनुभव घेत आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील भेटीदरम्यान राज्यातील ‘डिजिटल शाळा व लोकसहभाग’ या विषयावर मुंबई येथे सादरीकरण होणार आहे. सादरीकरणासाठी राज्यभरातून १३ जणांची चमू असून, यामध्ये पश्चिम वर्हाडातून वाशिम येथील देवीदास महाले या एकमेव शिक्षकाची वर्णी लागली आहे.- अंबादास मानकरशिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम.