शनिवार २५ फेब्रुवारी रोजी पार पडली. संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. धीरज वामनराव देशमुख तर उपाध्यक्ष म्हणून कैलास देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी बनसोडे यांच्या उपस्थित नवनिर्वाचित सदस्यांची बैठक बोलवण्यात आली. करडा सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष ,उपाध्यक्ष पदाकरिता सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये करडा सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. धीरज वामनराव देशमुख तथा उपाध्यक्षपदी कैलास रामचंद्र देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष वामनराव देशमुख यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या पीककर्ज विषयी सखोल चर्चा केली.
तसेच संस्थेने नियमित कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांना पन्नास हजारांचे अनुदान मिळवून देण्यासाठी संस्था सतत प्रयत्नशील राहील असे ठरविले. शेतकऱ्यांनी आपल्याकडील असलेले पीक कर्ज ३१ मार्चपूर्वी भरणा करून व्याज माफीचा लाभ घ्यावा असे आवाहनही याप्रसंगी करण्यात आले. ३१ मार्चपूर्वी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना १ एप्रिलपासून पीक कर्ज देण्यास प्रत्यक्ष सुरुवात करणार असल्याचे ठरविले.