या कालावधीत शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, लाठ्या किंवा काठ्या तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणे, कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडायची किंवा फेकायची साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, वाद्य वाजविणे, किंकाळ्या फोडणे किंवा जाहीरपणे प्रक्षोभक घोषणा करणे यावर बंदी घालण्यात आली.
अंत्ययात्रा, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी यांना हा आदेश लागू राहणार नाही. पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात परिस्थितीनुरूप योग्य कारण असेल व तसे करण्याशिवाय पर्याय नसेल तर अशा परिस्थितीत याबाबत कोणताही आदेश नजीकच्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याशी विचार विनिमय करून आदेश लागू करण्यास उपविभागीय दंडाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले तसेच आवश्यकता वाटल्यास उपविभागीय दंडाधिकारी यांनी संवेदनशील ठिकाणी विशेष कार्यकारी अधिकारी, दंडाधिकारी यांच्या नेमणुका कराव्यात, असे जिल्हादंडाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी आदेशात म्हटले आहे.