शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

कारंजातील बाजारात बैलजोडीचे दर दीड लाखांच्या वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 12:55 PM

Washim News कारंजातील गुरांच्या बाजारात दमदार बैलजोडीचे दर दीड लाखांच्या वर पोहोचले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गेल्या काही वर्षांपासून यांत्रिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने गाेवंशीय जनावरांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे बैलांना सोन्याचा भाव मिळत असून, कारंजातील गुरांच्या बाजारात दमदार बैलजोडीचे दर दीड लाखांच्या वर पोहोचले आहेत.शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरल्याने गुरांची संख्या घटली आहे. प्रामुख्याने बैलांचा खर्च शेतकऱ्यांना परवडत नसल्याने आता बैलांची संख्या घटली आहे. त्यामुळेच बाजारात बैलांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा मानल्या जाणाऱ्या कारंजा येथील बाजारात सोमवारी दमदार बैलजोडीला दीड लाखांच्या वरच दर मिळत असल्याचे दिसून आले.  कारंजा येथील गुरांच्या बाजारात वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नजीकच्या अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरीही गुरांच्या खरेदीसाठी येतात. त्यामुळे या बाजारात दर सोमवारी लाखोंची उलाढाला केवळ बैलांच्या खरेदी-विक्रीतूनच होत आहे. सोमवारी भरलेल्या गुरांच्या बाजारात एक लाख ४० हजार रुपयांना बैलजोडी विकल्या गेली.

२० लाखांची उलाढालकारंजा येथील गुरांच्या बाजारात वाशिम जिल्ह्यासह अमरावती, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यातील शेतकरी गुरांच्या खरेदीसाठी येत असतात. या ठिकाणी गाय, बैल, म्हैस यांच्यासह शेळ्यांची सर्वाधिक खरेदी-विक्री होते. यातून दर आठवड्याला २० लाखांच्यावर उलाढाल होत असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. त्यात बैलांसह म्हशीच्या किमती अधिक असल्याने प्रामुख्याने या दोन वर्गातील गुरांच्या खरेदी-विक्रीतूनच अधिक उलाढाल होत आहे. 

बैलजोडीवर दिवसाला १५० रुपये खर्चआधीच चाऱ्याचे दर वाढले असताना बैलांच्या देखभालीसाठी ठेवल्या जाणाऱ्या गड्याची मजुरीही वाढली आहे. त्यामुळे एका बैलजोडीसाठी कडबा, कुटार आणि गड्याच्या मजुरीसह इतर खर्च मिळून शेतकऱ्यांना दीडशे रुपये खर्च येत आहे.

गेल्या काही वर्षांपासून चाऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. कडबा मिळणे दुरापास्त असून, कुटाराचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बैलांसाठी पुरेसा चारा असणे आवश्यक आहे. त्यामुळे एकंदर गुरे पाळणे ही समस्याच झाली आहे.    

 - तुषार भिंगारे, शेतकरी, जानोरी,

 

चाऱ्याचा मोठ्या प्रमाणात असलेला तुटवडा, तसेच गुरांची देखभाल करण्यासाठी द्यावा लागणारा वेळ, या गोष्टी अडचणीच्या ठरत आहेत. वातावरणातील बदलामुळे वाढत असलेल्या आजारांमुळे गुरे पाळणे आता कठीण होऊन बसले आहे.

-अविनाश भिंगारे, शेतकरी, जानोरी

पूर्वी गुरांचा गोठा नाही, असा शेतकरी मिळणे कठीण होते; परंतु गुरांच्या चाऱ्यासह विविध गोष्टींसाठी लागणाऱ्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. भाकड जनावरांची समस्याही आता गंभीर झाल्याने गुरे पाळण्याचा विचारही करणे अशक्य आहे.- सुधाकर इंगळे, शेतकरी, इंझोरी 

टॅग्स :Karanjaकारंजाwashimवाशिम