लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विविध स्वरूपातील प्रलंबित प्रश्न विनाविलंब निकाली काढण्यात यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी शनिवारी स्थानिक जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.यासंदर्भात प्रशासनाकडे सादर केलेल्या निवेदनात शिक्षकांनी नमूद केलेल्या मागण्यांमध्ये १२ वर्षे सेवा झालेल्या प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी आणि २४ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना निवडश्रेणी लागू करा, उच्चश्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, विषय शिक्षक आदींच्या पदोन्नत्या तत्काळ करा, वैद्यकीय परिपुर्ती देयके मिळण्यासाठी होत असलेला विलंब दुर व्हावा, शालेय पोषण आहार मानधन व साहित्य खर्च वेळेवर अदा करण्यात यावा, शासनाच्या आदेशानुसार मुख्याध्यापकांनी स्वत:जवळून पोषण आहारासाठी खर्च केलेली रक्कम मिळावी, विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय मेळावे घेण्यात यावे, भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या मिळाव्या, बीएलओंच्या कामांची शिक्षकांना सक्ती करू नये, जिल्हा परिषद शाळांना विद्यूत देयक भरण्यासाठी रक्कमेची तरतूद करावी, ग्रामसभेचा सचिव म्हणून मुख्याध्यापकांना आदेश द्यावे, शाळा डिजिटल करण्यासाठी लागणारे अनुदान मंजूर करावे, आदी मागण्यांचा समावेश आहे. धरणे आंदोलनात जिल्हाभरातील शेकडो शेतकºयांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविल्याचे दिसून आले.
वाशिम जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी दिले धरणे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 5:25 PM