मालेगाव : मालेगाव तालुक्यातील सन २०११ चे आर्थिक सर्वेक्षणावर आधारीत प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल वाटप होणार असून, सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. घरकुलासंदर्भात फसवणूक होऊ नये म्हणून लाभार्थींनी कोणत्याही दलालाशी आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन गटविकास अधिकारी संदीप कोटकर यांनी केले.सन २०११ ला आर्थिक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार त्याची अंमलबजावनी सन २०१६ ते २०१७ नुसार सुरू असुन त्याचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे. त्यानुसार तालुक्यात २२ हजार अर्ज मालेगांव पंचायत समितीला प्राप्त झाले होते. त्यानुसार गटविकास अधिकारी संदीप कोटकर यांच्या मार्गदशनाखाली तालुक्यात १८ पथक तयार करण्यात आले. प्रत्येक पथकामध्ये १ प्रमुख व उपसहायक नेमल्या गेले होते. त्यांच्या साहाय्याने हे काम सुरू आहे त्यानुसार लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्या लाभार्थ्याला १३८००० रुपये अनुदान देण्यात येनार आहे. त्यांचे अपात्रता निकष नुसार २, ३ किंवा ४ चाकी वाहन, शेती, मशिनरी असल्यास, किसान क्रेडीट कार्ड आहे परंतु त्यांची मर्यादा ५०००० किंवा त्यापेक्षा जादा असल्यास, शासकीय नौकरी असल्यास नोंदनीकृत बिगरशेती व्यवसाय असल्यास, आयकर धारक असल्यास व्यवसाय कर भरणारे असल्यास, २ .५ एकर बागायत क्षेत्र आणि सिंचंनाचे कमीत कमी एक साहीत्य असल्यास ५ एक्कर किंवा त्यापेक्षा जादा बागायत क्षेत्र तसेच दोन हंगामात पीक घेतले जात असल्यास ७.५ एकर क्षेत्र आणि सिंचनाचे किमान एक साहित्य असल्यास तसेच पक्के घर बांधकाम असल्यास लाभार्थी अपात्र ठरविन्यात येनार आहेत. बाकी लाभार्थी पात्र ठरणार आहेत. मात्र काही लोक लाभार्थ्यांशी संपर्क साधुन पैसेची मागणी करीत असल्याच्या तक्रारी आहेत. या पृष्ठभूमीवर कुणीही कोणाशीही अर्थिक व्यवहार करू नये अशी माहिती गट विकास अधिकारी संदीप कोटकर यांनी दिली.
अटी पूर्ण करणाºया लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे मात्र आपला नंबर लागेल यासाठी लोक आर्थिक व्यवहार करतील, अशी शक्यताही नाकारता येत नाही. म्हणून कोणीही कोणत्याही दलालांशी आर्थिक व्यवहार करू नये. निकषानुसार लाभार्थी निवड होणार आहे.- संदीप कोटकर, गट विकास अधिकारी, मालेगाव.
आमच्या चमूने २२ हजार घरांचे सर्वेक्षण केले असून, सर्व माहिती लाभर्थ्यांची नावे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविली आहे. वरिष्ठ स्तरावर पुन्हा पाहणी झाल्यानंतर लाभार्थींची नावे निश्चित केली जाणार आहेत.
- रविन्द्र सोलव, विस्तार अधिकारी, मालेगाव