लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: तालुक्यातील मोहगव्हाण येथे अवैध दारू अड्डय़ावर छापा टाकून पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मोहमाच सडवा व अन्य साहित्य असा एकूण ४३ हजार ५00 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई १0 जून रोजी सायंकाळी केली.मोहगव्हाण येथील धरणाच्या परिसरात काही लोक गावठी हातभट्टीची दारू गाळत असल्याची माहिती मिळाल्यावरून विशेष पथकाने मोहगव्हाण धरणाचे काठावर हातभट्टी दारू गाळणारे इसमांवर छापा टाकला. घटनास्थळावर मोठय़ा प्रमाणात मोहमाच सडवा ७५0 लीटर जप्त केला. आरोपी तुकड्या खैरू नौरंगाबादी, नजीर रशीद नंदवाले दोन्ही रा. मोहगव्हाण यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक किरण साळवे यांच्यासह कैलास इंगळे, लक्ष्मण कोल्हे, प्रकाश सरनाईक, रामेश्वर जगताप, संजय नंदकुले, सुनील चव्हाण, राहुल व्यवहारे, बालाजी बर्गे, स्वप्निल शेळके, चालक मिलिंद गायकवाड, वाघमारे यांनी कारवाई केली.
अवैध दारू अड्डय़ावर छापा
By admin | Published: June 11, 2017 2:12 AM