शेलुबाजार (वाशिम): छत्तीसगढ राज्यातील रायपूर येथून पुणे येथे जाणाºया खासगी प्रवासी बसला नागी फाट्याजवळ शनिवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास अपघात झाला. त्यात २६ प्रवासी जखमी झाले. पहाटे ५.३० वाजेपर्यंत अपघातस्थळी मदतकार्य सुरू होते. महिंद्रा ट्रॅव्हल्सची प्रवासी बस रायपूर येथून पुण्याकडे जात असताना, शेलू बाजार नजीकच्या नागी फाटा या ठिकाणी एका अज्ञात वाहनाने बसला धडक दिली. यामुळे सदर बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. त्यात २६ प्रवाशांना दुखापत झाली; तर बसचा क्लिनर वाहनाखाली दबला होता. त्यास तब्बल साडेतीन तासानंतर जेसीबीच्या सहाय्याने बस हटविल्यानंतर बाहेर काढण्यात आले. या बसमध्ये प्रवास करित असलेल्या भंडारा येथील उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे यांनी घटनेची माहिती मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक यांना दिली. त्यावरून ४ रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. सुदैवाने या घटनेत कुठलीही प्राणहानी झाली नाही.
शेलु बाजारजवळ खासगी बसला अपघात; २६ प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 2:55 PM
शेलुबाजार (वाशिम): छत्तीसगढ राज्यातील रायपूर येथून पुणे येथे जाणाºया खासगी प्रवासी बसला नागी फाट्याजवळ शनिवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास अपघात झाला. त्यात २६ प्रवासी जखमी झाले.
ठळक मुद्देशेलू बाजार नजीकच्या नागी फाटा या ठिकाणी एका अज्ञात वाहनाने बसला धडक दिली. यामुळे सदर बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. त्यात २६ प्रवाशांना दुखापत झाली; तर बसचा क्लिनर वाहनाखाली दबला होता.