मालेगाव : शाळकरी मुले घेऊन जाणारे खासगी वाहन व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना रिसोड ते मालेगाव मार्गावरील केशवनगर-दापूरी दरम्यान ४ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दापूरी येथून एमएच ३७ जी २४३९ क्रमांकाचे खासगी वाहन १० ते १२ विद्यार्थी घेऊन केशवनगरकडे जात होते. तर विरूद्ध दिशेने एमएच ३७ के ५२४१ क्रमांकाच्या दुचाकीने विजय बबन खरात येत होते. केशवनगर ते दापूरी या गावादरम्यान खासगी वाहन व दुचाकीची समारोसमोर धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वार विजय खरात हे गंभीर जखमी झाले. सुदैवाने शाळकरी मुले या अपघातातून बालंबाल बचावली. अपघातानंतर विद्यार्थी घाबरलेल्या अवस्थेत दिसून आले. १०८ क्रमांकावरून संपर्क साधून रुग्णवाहिकेची मदत मागितली तसेच पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळावर पोलीस उपनिरीक्षक गिरीश तोगरवाड, बीट जमादार विजय चव्हाण यांनी भेट देऊन जखमीला उपचारासाठी दवाखान्यात हलविले.
खासगी वाहनाची दुचाकीला धडक; एक जण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 1:19 PM
मालेगाव : शाळकरी मुले घेऊन जाणारे खासगी वाहन व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना रिसोड ते मालेगाव मार्गावरील केशवनगर-दापूरी दरम्यान ४ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
ठळक मुद्देदापूरी येथून एमएच ३७ जी २४३९ क्रमांकाचे खासगी वाहन १० ते १२ विद्यार्थी घेऊन केशवनगरकडे जात होते विरूद्ध दिशेने एमएच ३७ के ५२४१ क्रमांकाच्या दुचाकीने विजय बबन खरात येत होते. केशवनगर ते दापूरी या गावादरम्यान खासगी वाहन व दुचाकीची समारोसमोर धडक झाली.