लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: स्थानिक पशू वैद्यकीय केंद्रातील पशूधन विकास अधिका-यांची २२ दिवसांपूर्वी बदली झाली; परंतु त्यांच्या जागेवर दुस-या अधिका-याची नियुक्तीच करण्यात आली नसल्याने १३ गावांतील पशूपालक अडचणीत आहेत. या १३ गावांतील १४ हजार पशूधनाचे आरोग्यही त्यामुळे वा-यावर पडले आहे. मालेगाव तालुक्यातील सर्वाधिक पशूधन संख्या शिरपूर पशू वैद्यकीय केंद्रांतर्गत आहे. या ठिकाणी आजच्या घडीला ८९०० पशूधन घटक म्हणजेच १४ हजार पशूधन आहे. या पशूधनाला वेळोवेळी लसीकरण करून त्यांच्या आरोग्याची निगा राखण्याची जबाबदारी पशू वैद्यकीय केंद्रातील डॉ. स्वप्नील महाळंकर यांच्यावर होती; परंतु त्यांची २२ दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात बदली झाली. त्यांच्या जागेवर डॉ. जया राऊत यांना शिरपूर येथे नियुक्त करण्याचे आदेशही झाले. दरम्यान, डॉ. महाळंकर यांनी ६ आॅक्टोबर रोजी शिरपूरचा प्रभार सोडला; परंतु त्यांच्या जागेवर नियुक्त करण्यात आलेल्या डॉ. जया राऊत अद्यापही शिरपूर वैद्यकीय केंद्रात रुजू झाल्या नाहीत. त्यामुळे येथील १४ हजार पशूधनाचे आरोग्य वाºयावर पडले असून, गुरांवरील आजारांसाठी पशूपालक खाजगी पशूवैद्यकांचा आधार घेत आहेत. दरम्यान, डॉ. जया राऊत रुजू न झाल्याने मेडशीचे पशूधन विकास अधिकारी डॉ. किरण सिसाठी यांनी २२ दिवसांत येथे दोन वेळा भेट देऊन पशूंवर उपचार केले. तथापि, स्थायी स्वरूपाचा पशूधन विकास अधिकार उपलब्ध नसल्याने पशुपालकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
पशूधन विकास अधिका-यांअभावी १३ गावांतील पशूपालक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 10:30 PM
शिरपूर जैन: स्थानिक पशू वैद्यकीय केंद्रातील पशूधन विकास अधिका-यांची २२ दिवसांपूर्वी बदली झाली; परंतु त्यांच्या जागेवर दुस-या अधिका-याची नियुक्तीच करण्यात आली नसल्याने १३ गावांतील पशूपालक अडचणीत आहेत. या १३ गावांतील १४ हजार पशूधनाचे आरोग्यही त्यामुळे वा-यावर पडले आहे.
ठळक मुद्देशिरपूर येथील वास्तव१४ हजार पशूंचे आरोग्य वा-यावर